Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

महिलांनी स्‍वतःमधील शक्‍ती ओळखुन सक्षम बनावे व इतरांनाही सक्षम करावे – सौ. शिल्‍पा पाचघरेस्‍व. सुषमा स्‍वराज सन्‍मान देवून हिरकणींचा सत्‍कार करताना मनस्‍वी आनंद – सौ. अंजली घोटेकर

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महानगर चंद्रपूरतर्फे ‘सुषमा स्‍वराज्‍य सन्‍मान’ देवून दिनांक १२ मार्च २०२३ रोजी श्री माता कन्‍यका परमेश्‍वरी सभागृहामध्‍ये ८ मार्च महिला दिनानिमीत्‍त महानगरातील हिरकणी कर्तृत्‍ववान महिलांचा सन्‍मान सत्‍कार करण्‍यात आला. हा कार्यक्रम मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार पालकमंत्री, ओबीसी आयोगाचे अध्‍यक्ष श्री. हंसराजभैय्या अहीर यांच्‍या मार्गदर्शनात व महिला मोर्चा प्रदेशाध्‍यक्षा मा. सौ. चित्राताई वाघ यांचे सुचनेनुसार घेण्‍यात आला. या कार्यक्रमाला भाजपाचे महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे आणि महानगराच्‍या समन्‍वयक मा. शिल्‍पाताई पाचघरे प्रामुख्‍याने उपस्थित होत्‍या. हा कार्यक्रम सौ. अंजली घोटेकर जिल्‍हाध्‍यक्षा महिला मोर्चा महानगर चंद्रपूर यांच्‍या नेतृत्‍वात घेण्‍यात आला. या कार्यक्रमामध्‍ये डॉ. सौ. प्रेरणा कोलते-आरूषी फाऊंडेशन, डॉ. प्रिती सरबेरे-माधवबाग, सौ. भारती गुंदेचा–सामाजिक कार्यकर्त्‍या, अर्चना मानलवार–ज्ञानार्जना दिव्‍यांग सेवा समिती, सौ. रमा गर्ग–रोटरी क्‍लब, सौ. पुनम कपुर–स्‍मार्ट सिटी, डॉ. विद्या बांगडे–रोटरी क्‍लब, प्रा. विजयालक्ष्‍मी पारिख– पहिली टोफु उत्‍पादक, शारदा हुसे–खुशिया लोक संचालित सेवा समिती, मेघना शिंगरू–उद्योजिका, सौ. शालिनी शंकर टेकाम–आशावर्कर यांचा स्‍व. सुषमा स्‍वराज अवार्ड ट्रॉफी, शॉल देवून सन्‍मान करण्‍यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक जिल्‍हाध्‍यक्षा सौ. अंजली घोटेकर यांनी केले आणि त्‍यांनी या कार्यक्रमाचे महत्‍व विशद करून सांगीतले. यावेळी महानगर समन्‍वयक शिल्‍पा पाचघरे म्‍हणाल्‍या की, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे नेहमी आगळे-वेगळे कार्यक्रम घेण्‍यात येतात. आज महिला कोणत्‍या क्षेत्रात कमी नाही. स्‍वतःचे घर सांभाळुन पुरूषाच्‍या खांदयाला खांदा लावून समाजात काम करीत आहे. प्रमुख पाहुणे महानगर भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेशजी गुलवाडे म्‍हणाले की, भारतीय जनता महिला मोर्चातर्फे अतिशय चांगला कार्यक्रम घेण्‍यात आला. आज ख-याअर्थाने महिला सक्षम झाल्‍या आहेत. आपल्‍या सोबतच त्‍या इतर महिलांना सुध्‍दा स्‍वयंरोजगाराकडे वळवित आहे. महिलांनी आपली शक्‍ती ओळखुन काम केले पाहीजे.

सर्व मान्‍यवरांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त करताना सांगीतले की, आज आमचा सुषमा स्‍वराज सन्‍मान देवून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाद्वारे सत्‍कार करण्‍यात आला त्‍याबद्दल आभार व्‍यक्‍त करतो. डॉ. प्रेरणा कोलते म्‍हणाल्‍या की, आरूषी फाऊंडेशनच्‍या माध्‍यमातुन समाजातील गोरगरीब, दीनदुबळया, पिडीत मुलींचे सक्षमीकरण करण्‍याकरिता आणि त्‍यांना न्‍याय मिळविण्‍याकरिता आम्‍ही कार्य करीत असतो. सौ. रमा गर्ग, सौ. पुनम कपूर आणि सौ. विद्या बांगडे म्‍हणाल्‍या की, रोटरीच्‍या माध्‍यमातुन सुध्‍दा आम्‍ही मुलांना मोफत गणवेश वाटप करीत असतो तसेच महिलांना विविध प्रशिक्षण देत असतो. शहरामध्‍ये महिलांना असुविधा होवू नये म्‍हणून तीन टायलेट बाथरूमची व्‍यवस्‍था आम्‍ही केलेली आहे. डॉ. प्रिती सरबेरे म्‍हणाल्‍या की, माधवबागच्‍या माध्‍यमातुन लोकांचे हृदय कसे सुदृढ राहावे याकरिता आम्‍ही अत्‍यल्‍प मोबदल्‍यामध्‍ये काम करीत असतो. टोफू उत्‍पादक विजयालक्ष्‍मी पारिख म्‍हणाल्‍या की, बचतगटाकरिता टोफू उत्‍पादन हे अतिशय चांगले रोजगाराचे साधन होवू शकते. खुशिया लोकसंचालित समितीच्‍या शारदा हुसे म्‍हणाल्‍या की, माझ्याकडे १२०० बचतगट आहेत. जे मी महिला आर्थीक विकास महामंडळाला जोडलेल्‍या आहेत आणि त्‍या माध्‍यमातुन या सर्व बचतगटांना स्‍वयंरोजगाराचे प्रशिक्षण देवून त्‍यांना सक्षम बनविण्‍याचे काम करते. आशावर्कर सौ. शालिनी टेकाम बोलल्‍या की, मी घरोघरी जावून ज्‍या घरामध्‍ये गरोदर माता असेल तिच्‍या प्रसुतीपर्यंतच्‍या सर्व सुविधा मनपा द्वारे मिळवून देतो व बाळाची काळजी कशी घ्‍यावी, वेळोवेळी त्‍याचे लसीकरण कसे करावे याबद्दल झोपडपट्टीतील महिलांना प्रशिक्षीत करते. सौ. मेघना शिंगरू म्‍हणाल्‍या की, आज स्‍त्रीने पुरूषांच्‍या बरोबरीने खांदयाला खांदा लावून प्रत्‍येक क्षेत्र काबीज केले आहे. आज महिला प्रत्‍येक क्षेत्रात उतरली आहे. चंद्रपूरमध्‍ये अनेक कार डेकारेचे शॉप आहेत, जे पुरूष चालवितात आणि म्‍हणूनच मलाही वाटले की, आपणही हे काम करू शकतो आणि म्‍हणून महानगरामध्‍ये माझेही मेघना कार डेकोर शॉप आहे. त्‍याद्वारे मी इतर महिलांनाही सांगत असते की, आपल्‍या मधील गुण ओळखुन काम करा तसेच हे सर्व सांभाळून मी नाटयक्षेत्रात देखील काम करीत आहे. सामाजिक कार्यकर्त्‍या भारती गुंदेजा म्‍हणाल्‍या की, आज आपल्‍या घरामध्‍ये अनेक गरजु महिला काम करतात. अनेक महिलांची इच्‍छा असते की एकदा तरी वैष्‍णवदेवीचे दर्शन घ्‍यावे अशी इच्‍छा माझ्या घरी काम करणा-या महिलेने देखील बोलुन दाखविली. तेव्‍हा मी विचार केला की, आपण पुढाकर घेवून अशा सर्व महिलांना वैष्‍णोदेवीचे दर्शन करवून आणावे आणि बघता बघता १०२ कामकरी महिलांनी यात यात्रेसाठी सहभाग नोंदविला आणि १०२ महिलांना वैष्‍णोदेवीचे दर्शन करण्‍याचे सौभाग्‍य मला लाभले. यात मला माझे पती नितीन गुंदेचा भरपूर सहकार्य दिले. अर्चना मानलवार म्‍हणाल्‍या की, मी जरी दिव्‍यांग असले तरीही मी मनाने सुदृढ आहे आणि म्‍हणूनच माझे सारख्‍या इतर बहिणींना काय अडचण येत असेल याची जाणीव मला आहे. तरी त्‍या हाता-पायाने अधू असल्‍या तरीही त्‍यांनी समाजामध्‍ये आपल्‍या कार्याने मान उंच करून जगले पाहीजे. याकरिता मी त्‍यांना सक्षम करण्‍याकरिता गृहउद्योगाचे धडे देते आणि त्‍या माध्‍यमातुन एक वेगळे समाधान त्‍यांच्‍या चेह-यावर बघुन मलाही आनंद होते.

या कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेकरिता सौ. शिला चव्‍हाण महामंत्री, छबु वैरागडे, वंदना संतोषवार ओबीसी मोर्चा, भाजपा उपाध्‍यक्षा, महिला मोर्चा उपाध्‍यक्षा रेणु घोडेस्‍वार, विशाखा राजुरकर, प्रभा गुडधे, चंद्रकला सोयाम, स्मिता रेभनकर, मसराम ताई, माजी नगरसेविका पुष्‍पा उराडे, वंदना तिखे, माया उईके, सचिव सिंधु राजगुरे, रमिता यादव, वंदना राधा रपवार, उज्‍वला नगराळे, सौ. पुष्‍पा शेंडे, सारिका उराडे, शालु कनोजवार, वर्षा सोमलकर, सौ. चिंता, कलाकुरवार ताई, सौ. प्रिती सरकार, अभिलाषा मेंदळकर, खुशिया लोकसंचालित समितीच्‍या सर्व कार्यकर्ता आणि असंख्‍य कार्यकर्ता भगिनींचा सहभाग लाभला. या कार्यक्रमाचे संचालन विशाखा राजुरकर यांनी तर आभार प्रदर्शन उज्‍वला नगराळे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies