Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

स्वावलंबी नगरातील “महिला क्रिकेट” सामन्याला उत्स्फूर्त प्रतिसाद!



माजी उपमहापौर राहुल पावडे यांच्या तर्फे आयोजन!

चंद्रपूर (प्रति.)
चंद्रपूर शहरातील स्वावलंबीनगर परीसरात शहराचे लोकप्रिय माजी उपमहापौर राहुल पावडे यांच्या मुख्य आयोजनातून योगनृत्य परिवारातर्फे “महिला क्रिकेट लीग” सामन्यांचे रविवार दि. १९ पासून आयोजन करण्यात आले असून उद्या सोमवार दि. 27 ला या सामन्यांचा समारोप होणार आहे.


सात दिवस चालणाऱ्या महिलांच्या या क्रिकेट सामन्यात शहरातील १२ टिम सहभागी झाल्या असून या सामन्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपल्या कार्याने महाराष्ट्रातील राजकारणात चंद्रपूर चे नांव उंचावणारे चंद्रपूर चे पालकमंत्री नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे नेहमी महिलांच्या सशक्तीकरण व सुदृढीकरणात जिल्हा अग्रस्थानी असावा, यासाठी आग्रही असतात. त्यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धांचे नेहमी आयोजन होत असते. स्वावलंबी नगरात आयोजित केलेली महिला क्रिकेट स्पर्धा ही त्याचाच एक भाग असल्याचे यावेळी माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी सांगितले. यानंतर ही महिलांच्या सबलीकरण व सशक्तीकरणासाठी विविध योजनांची व स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही पावडे यांनी यावेळी दिली. महिला सक्षम-सुदृढ राहिल्यास देश बळकट होतो. एकविसाव्या शतकात भारतीय महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही.


मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वात केंद्र सरकार करवी महिलोन्नती साठी भरीव प्रयत्न सुरू आहेत. महिलांना आर्थिक बळकटी मिळाली यासाठी केंद्रातील मोदी सरकार ने महिला बचत गटांसाठी अनेक नाविण्यपूर्ण योजना राबवून चुल आणि मुल यात रमलेल्या देशातील महिलांना आर्थिक बळकटी देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. आर्थिक उन्नतीसोबत शारिरीक बळकटी साठी महिलांनी खेळाकडे आपले लक्ष वेधावे यासाठी ही केंद्रातील मोदी सरकार प्रयत्नशिल आहे. स्वावलंबी नगर येथे आयोजित "महिला क्रिकेट लिंग" च्या सामन्यांचे यशस्वी आयोजन महिलांच्या सुदृढीकरणासाठी उचलले एक पाऊल आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. चुलं अन् मुलं या रोजच्या दैनंदिन कार्यक्रमांमधून वेळ काढून महीला भगीनी याठिकाणी उत्तमरीत्या आपले क्रिडा कौशल्याचे प्रदर्शन करीत आहेत. चंद्रपूरातील योगनृत्य परिवाराच्या माध्यमातून नेहमीच विविधांगी कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन होत असते हे कौतुकास्पद आहे. माजी उपमहापौर राहुल पावडे यांच्या मुख्य आयोजनातून साकार झालेल्या या योगनृत्य परिवार यांच्या सहकार्यातून महिला क्रिकेट सामन्यांची चर्चा शहरात होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies