बेलदार समाजाच्या वतीने सुरज पेदूलवार यांचा सत्कार
कोविड-१९ च्या स्वरुपात आलेल्या जागतिक आरोग्य संकटात आपण मोठया प्रमाणात प्रभावित झाले. या काळात अत्यंत वाईट अवस्थेत आपल्याला जगावे लागले. असंख्य वाईट गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागला. अनेकांनी आपले आप्त स्वकीय गमावले. परंतु या संकटात अनेक तरुण देवरुपाच्या स्वरुपात मदतीला पुढे देखिल आले. चंद्रपूर येथील सुरज पेदुलवार या होतकरु तरुणाने कोविड-१९ मध्ये सामाजिक कार्यात स्वतःला झोकुन दिल्याबद्दल विदर्भ बेलदार समाज संघटना राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये सह्रदय सत्कार करण्यात आला.
दि. २२ जाने. २०२३ रोजी शकुंतला लॉन येथे विदर्भ बेलदार समाज संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात कोविड-१९ मध्ये नागरिकांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करुन देत मदतीचा हात देणा-या सुरज पेदुलवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बेलदार समाजाचे प्रांतीय अध्यक्ष चंद्रशेखर कोट्टेवार, प्रांतीय कार्य अध्यक्ष आनंदराव अंगलवार, प्रांतीय उपाध्यक्ष राजेश कात्रटवार, अरविंद गांगुलवार, प्रांतीय सचिव रविंद्र बंडीवार, ज्येष्ठ नेत्या प्रभाताई चिलके आदी उपस्थित होते.
कोविड-१९ या काळात उपचार घेऊन परत आलेल्या रुग्णांचे निर्जंतुकीकरण, रुग्णांना फळ वाटप, जेवण व्यवस्था, ऑक्सीजन कॉन्स्ट्रीटीशन मशिन उपलब्ध करुन देणे, गरिब नागरिकांना धान्य किट उपलब्ध करुन देणे, वयोवृध्दांची सुशृषा, मृतांच्या नातेवाईकांना मदत, प्रवाशांना अन्न पाण्याची सुविधा, समुपदेशन आदी सुविधा सुरज पेदुलवार यांनी उपलब्ध करुन दिल्या होत्या. त्यांच्या या कार्याबद्दल बेलदार समाजाच्या वतीने त्यांचा सह्रदय सत्कार करण्यात आला. यावेळेस प्रमोद येडलावार, मनिष कन्नमवार, आनंद कार्लेकर, सचिन चलकलवार तसेच मित्रपरीवाराने त्यांचे अभिनंदन केले.