Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

त्या रस्त्याच्या बाजूने लोखंडी जाळीची संरक्षण भिंत उभारण्यात यावी A guard wall of iron mesh should be erected along that roadभाजयुमोचे महामंत्री सुनिल डोंगरे यांचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन

चंद्रपूर :- शास्त्रीनगर प्रभागातील अयप्पा मंदीर ते नेहरू नगर पर्यंत (अंदाजे 3 कि.मी.) रस्त्याच्या एका बाजुला लोखंडी जाळीची संरक्षण भिंत बांधण्याकरीता निधी उपलब्ध करून द्यावा.ही भिंत उभारून नागरिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करावे अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे महामंत्री सुनिल डोंगरे यांनी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे केली
यावेळी ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेशी चर्चा करताना सुनील डोंगरे म्हणाले,अयप्पा मंदीर ते नेहरू नगर रोडच्या एका बाजुला डब्लु.सी.एल. व जंगलाचा भाग असून येथे मोठया प्रमाणात झाड झुडपी आहेत त्यामुळे येथे वन्य प्राण्यांचा जसे बिबटे, आस्वल यांचा वावर येथे मोठया प्रमाणत आहे. येथील नागरीकांना बिबटे, आस्वली अनेकदा निर्देशनास आले असून संध्याकाळच्या वेळेस हे वन्य प्राणी वस्तीकडे येत असतात. सकाळ व संध्याकाळच्या वेळेस अनेक जेष्ठ नागरीक फीरण्याकरीता या मार्गाचा वापर करीत असल्यामुळे येथील नागरीकांच्या मनात भितीचे वातारवण आहे.
अयप्पा मंदीर ते नेहरू नगर पर्यंत लोखंडी जाळीची संरक्षण भिंतीचे बांधकाम केल्यास वन्य प्राण्यांना वस्तीकडे येण्याकरीता अडथळा निर्माण होवून या समस्यांचे निवारण होवू शकेल.अशी माहिती त्यांनी दिली.
अयप्पा मंदीर ते नेहरू नगर अंदाजे 3 कि.मी. रस्त्याच्या एका बाजुला लोखंडी जाळीची संरक्षण भिंत बाधण्याकरीता निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भाजयुमोच्या सुनील डोंगरे यांनी पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies