चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री बहुजनाचा जाणता राजा, स्वातंत्रसेनानी कर्मवीर मारोतराव सांबशिवपंत उपाख्य कन्नमवार यांचे १० जानेवारी रोजी शासकीय व निमशासकीय जयंती साजरी करण्यासंदर्भात कर्मवीर दादासाहेब प्रचार व प्रसार समिती, महाराष्ट्र अंतर्गत बेलदार समाज, भटके विमुक्त जाती, विविध ठिकाणाहून विविध संघटना मार्फत ईमेल आणि पत्र व्यवहार २०१३ पासून करण्यात आलेला आहे. परंतु अद्यापही कोणत्याही सरकारने या मागणीकडे लक्ष दिले नाही. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची सर्वप्रथम शासकीय जयंती साजरी करणारे कर्मवीर दादासाहेब कन्नमवार होते. आशिया खंडातील सर्वात मोठे नागपुर येथील मेडीकल कॉलेज दादासाहेबानी सुरू केली. ताडोबा राष्ट्रीय उद्यान, भद्रावती, वरणगाव आणि भंडारदरा येथील संरक्षण आयुध निर्माण कारखाना, वणी वरोरा मार्गावरील पाटाळा पुल, सिरोचा येथील पुल असे अल्पावधीत बरेच कार्य त्याच्या हातुन घडले आहे .
अश्या लोकनेत्याचा आज संपूर्ण महाराष्ट्राला विसर पडला आहे …..
एक पेपर विकणारा मुलगा आपल्या अविरत सेवेने राष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचतो. महाराष्ट्र राज्य निर्माण व्हायच्या आधी सी.पी. अॅन्ड बेरार (मध्यप्रांत) च्या मंत्रीमंडळात आरोग्यमंत्री , बांधकाम मंत्री म्हणून काम पाहतो. महाराष्ट्र राज्याचे पहीले उपमुख्यमंत्री दुसरे मुख्यमंत्री पद भूषवितो. १९४८ साली भारताच्या राज्यघटना समीतीत निवड होतो. १९५० ते १९५२ या कालावधीत लोकसभा सदस्य म्हणून तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रीमंडळात काम करतो. असे महामानव कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची महाराष्ट्र शासनाने शासकीय जयंती साजरी करण्याकरीता भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुरज पेदुलवार यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री तथा चंद्रपुर जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांना निवेदणाद्वारे केली यावेळी यावेळेस दिवाकर पुद्दटवार , हर्षल बोरतवार , अनिकेत दाचेवार , रोहीत कुंभलवार , सौरभ बोरतवार ,अभिजीत गोगेवार , मयुर पोडचलवार , अमोल फेथपुलवार , शुभम पोडजलवार , संचीत कुंभलवार इत्यादी उपस्थित होते