सुधीरभाऊंमुळे बेरोजगार धनराज पेंदामची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
चंद्रपूरातील भिवापूर वॉर्डात राहणार्या धनराज पेंदाम या युवकाला भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या मालवाहू सायकलचे वितरण महानगर भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी काल केले.
भिवापूर वॉर्डात राहणारा धनराज हा रोजगाराचे स्त्रोत नसल्याने बेरोजगार होता. त्यामुळे त्याने ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना भेटून मदतीची अपेक्षा केली. त्यावेळेस ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी त्याला स्वयंरोजगार कर तुला लागेल ते मदत केल्या जाईल असा शब्द दिला. त्याचनुसार त्यांनी धनराजला आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने मालवाहू सायकल भेट म्हणून दिली. त्यामुळे त्याच्या उदरनिर्वाहासाठी मोठी मदत होईल. काल भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महानगर भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी धनराजला त्याची सायकल सुपूर्द करत पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी उपमाहापौर राहुल पावडे, भाजयुमोचे महानगर महामंत्री प्रज्वलंत कडू, महानगर उपाध्यक्ष सुरज पेद्दूलवार, मंडळ महामंत्री विवेक शेंडे, भाजयूमो महामंत्री सुनील डोंगरे, माजी नगरसेविका सुष्माताई नागोसे, संतोष जिल्लावार, भाजयुमो उपाध्यक्ष श्रीकांत येलपूलवार, आकाश ठुसे, मनोज पोतराजे, सागर हांडे, राजेश यादव, वैभव बल्लेवार याठिकाणी उपस्थित होते.