Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चंद्रपूरकरांच्‍या श्रध्‍देशी निगडीत महत्‍वपूर्ण विकास प्रकल्‍प मार्गी लागणार असल्‍याचा मनापासून आनंद – सुधीर मुनगंटीवार



श्री अंचलेश्‍वर मंदीर परिसराचा विकास केंद्राच्‍या प्रसादम योजनेच्‍या माध्‍यमातुन करणार.

श्री महाकाली मंदीर परिसर विकासाच्‍या निविदेला शासनमान्‍यता मिळाल्‍याबद्दल भाजपातर्फे आनंदोत्‍सव व महाआरती.


चंद्रपूरचे आराध्‍य दैवत माता महाकाली मंदीर हा आमच्‍यासाठी आस्‍थेचा, श्रध्‍देचा व जिव्‍हाळयाचा विषय आहे. या मंदीर परिसराचा विकास करण्‍यासाठी माझ्या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात ६० कोटी रू. निधी मी मंजूर करविला. आता या कामाच्‍या निविदेला शासनाची मंजूरी मिळाल्‍यामुळे या मंदीर परिसराच्‍या विकासकार्याला लवकरच प्रारंभ होणार आहे. तमाम चंद्रपूरकरांच्‍या श्रध्‍देशी निगडीत हा विषय मार्गी लागणार असल्‍याने विलक्षण समाधान मी अनुभवत आहे, असे भावपूर्ण प्रतिपादन राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य तसेच मत्‍स्‍यव्‍यवाय तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


दिनांक १४ नोव्‍हेंबर रोजी चंद्रपूर शहरातील महाकाली मंदीर परिसरात भाजपातर्फे आयोजित महाआरती कार्यक्रमाच्‍या निमीत्‍ताने श्री. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्‍हणाले, श्री महाकाली मंदीराशेजारील दुसरे श्रध्‍दास्‍थान श्री अंचलेश्‍वर मंदीराचा विकास केंद्र सरकारच्‍या प्रसादम योजनेच्‍या माध्‍यमातुन आपण करणार आहोत. लोकप्रतिनिधी म्‍हणून श्री महाकाली मंदीर परिसराचा विकास, श्री अंचलेश्‍वर मंदीर परिसराचा विकास करणे हे आपले पुर्वीपासुनचे स्‍वप्‍न आहे. आता हे स्‍वप्‍न मुर्तरूप घेत आहे याचा विशेष आनंद आहे. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी श्री गंगानदी तटावर रिव्‍हर फ्रंट विकास कार्य ज्‍या पध्‍दतीने केले आहे त्‍याच धर्तीवर आपण गोदावरी नदी तटावर रिव्‍हर फ्रंट विकास करणार आहोत. हीच प्रक्रिया चंद्रपूरातील झरपट नदी तटावर सुध्‍दा करण्‍याच्‍या दृष्‍टीने आपण प्रयत्‍नशील आहोत, असेही श्री. सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.


श्री महाकाली मंदीर परिसराच्‍या विकासासाठी ६० कोटी रू. निधी मंजूर झाला व या कामाच्‍या निविदेला शासनाची मंजूरी मिळाल्‍याबद्दल भाजपा चंद्रपूर महानगर शाखेतर्फे आनंदोत्‍सव साजरा करण्‍यात आला व श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते महाआरती देखील करण्‍यात आली. यावेळी विविध धार्मीक संघटना, मंदीर परिसरातील दुकानधारक, विविध क्रिडा मंडळे, गणेश मंडळे, डिजे संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्‍कार केला.

यावेळी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, प्रमोद कडू, माजी उपमहापौर राहूल पावडे, महिला आघाडीच्‍या महानगर जिल्‍हाध्‍यक्षा सौ. अंजली घोटेकर, महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमो महानगर अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, संदीप आगलावे, प्रज्‍वलंत कडू, सौ. छबू वैरागडे, सचिन कोतपल्‍लीवार, रवि लोणकर, चंद्रकला सोयाम, मंदिराचे विश्‍वस्‍त सुनिल महाकाले, सौ. आशा महाकाले, मनोहर टहलियानी, रवि आसवानी, सौ. रेणु घोडेस्‍वार, रवि जोगी, सौ. कल्‍पना बगुलकर, सौ. सविता कांबळे, सौ. शिला चव्‍हाण, सोपान वायकर, प्रदिप किरमे, शाम कनकम, सतिश उर्फ मन्‍ना महाराज, माया उईके, अरूण तिखे, सुनिल डोंगरे, प्रमोद क्षिरसागर, राजकुमार पाठक, मनोज पोतराजे, धम्‍मप्रकाश भस्‍मे, रूद्रनारायण तिवारी, रोडमल गहलोत, सुरेश तालेवार, प्रमोद शास्‍त्रकार, सुर्यकांत कुचनवार, चंदन पाल, राजेंद्र खांडेकर, मोनीशा महातव, आशिष ताजने, चंदन पाल, सुशांत आक्‍केवार, सुशांत शर्मा, संजय निखारे, महेश राऊत, अमित गौरकार, अमोल मत्‍ते, नूतन मेश्राम, कविता जाधव, सुर्या खजांची, सिंधु राजगुरे, सारीका सुंदरकर, प्रभा गुडधे, चांद सय्यद, राजेश यादव, ज्ञानचंद तैलानी, तेजा सिंग, गणेश रामगुंडावार, पप्‍पु बोपचे, सुरेश हरीरामानी, सुजिता मुरस्‍कर, रंजीता येले, देवतळे ताई, मुग्‍धा खाडे, गणेश रासपायले, महेश कोलावार, अक्षय शेंडे, रंजना उमाटे, क्षिरसागर ताई, अमोल नगराळे आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies