चंद्रपूर मुल महामार्गावरील स्ट्रीट लाईट व गतिरोधक बसवा
भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनोज पोतराजे यांची मागणी
चंद्रपूर :- मुल राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम पूर्ण होऊनही या महामार्गावरील स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे अपघात होत आहे. इंदिरानगर चौकामध्ये महाविद्यालय, आणि छोटी बाजारपेठ आहे. वेगाची मर्यादा न पाळता वाहने दामटणाऱ्या वाहनचालकांना आवर घालण्यासाठी आणि होणारे अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक लावण्यात यावे व नवीन स्ट्रीट लाईट लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महानगर उपाध्यक्ष मनोज पोतराज यांनी राष्ट्रीय महामार्गाचे उपाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
चंद्रपूर मुल या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची भरधाव वेगाने वर्दळ सुरू असते या महामार्गावर 25 डिसेंबर च्या रात्री मुल वरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने इंदिरानगर इथून येणाऱ्या गोमासे यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये गोमासे यांच्या जागी मृत्यू झाला. असे अपघात या मार्गावर होत असतात. सात दिवसाच्या आत गतिरोधक व स्ट्रीट लाईट लावण्यात आले नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी माजी नगरसेविका चंद्रकला ताई सोयाम, भाजप युवा मोर्चा सचिव आशिष ताजने, हे उपस्थीत होते.