पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होणार १७ ऑक्टोबरला बैठक
चंद्रपूर येथील बाबुपेठ मंडळातील महाकाली काॅलरी वार्ड, अष्टभुजा वार्ड, हिंदूस्थान लालपेठ काॅलरी वार्ड,बाबानगर, गौरी तलाव वार्ड, गणेश एजन्सी प्लाट, बाबुपेठ या परिसरात मागील ३० ते ३५ वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना वेकोली रयतवारी उपक्षेत्र, हिंदुस्थान लालपेठ उपक्षेत्र यांच्या अधिनस्त उपक्षेत्रीय सम्पदा अधिकारी यांच्या स्वाक्षरी ने नागरिकांना जमीन खाली करण्या बाबत नोटीस बजावली, त्यामुळे निराश नागरिकांनी ही बाब भाजयुमो महामंत्री प्रज्वलंत कडू यांच्याकडे सांगितली. प्रज्वलंत कडू यांनी ताबडतोब शिष्टमंडळासमवेत पोहचून जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्यक्ष भेटत समस्याग्रस्तांच्या अडचणी सांगीतल्या. संबधीत नागरिकांचे निवेदन स्वीकारत संबधीत अधिकाऱ्यांना येत्या १७ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ५ वाजता बैठक लावण्याच्या सूचना दिल्या.
मागील अनेक वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या निराश नागरिकांना ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या बैठकीच्या सुचनेमुळे धीर आला. यावेळी शिष्टमंडळासोबत बाबुपेठ मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे ,भाजयुमो महामंत्री प्रज्वलंत कडू,भाजपा उपाध्यक्ष सुरजजी पेद्दूलवार, राजेश यादव,सागर भगत, मंगेश तामगाडगे,रघु गुंडला, आकाश लक्काकुलवार, विवेक शेंडे, कुणाल गुंडावार, हिमांशू गादेवार, रवींद्र ऊमाटे, राजेंद्र दागमवार, दशरथ सोनकुसरे, मारोती पारपेल्लीवार, आकाश ठुसे, व मंडळ भाजपा पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला मोर्चा पदाधिकारी नेते मंडळी उपस्थित होते