चंद्रपूर : दि. ७ ऑगस्ट २०२२ ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ७वे राष्ट्रीय महाअधिवेशन तालकटोरा स्टेडियम, न्यू दिल्ली येथे होणार आहे. या अधिवेशनाकरीता पूर्व विदर्भातून शेकडो ओबीसी बांधव दिल्ली करीता रवाना झाले आहेत.
यात प्रथम सत्राचे उदघाटन मा. शरद पवार साहेब यांचे हस्ते होणार असून, डॉ. बबनराव तायवाडे स्वागतपर भाषण करतील, तर डॉ. अशोक जीवतोडे या सत्रात अध्यक्षीय भाषण करणार आहेत.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सचिन राजूरकर जनरल सेक्रेटरी, राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांनी केले असून या कार्यक्रमात प्रामुख्याने मा. भुपेश बघेल मुख्यमंत्री छत्तीसगढ, मा. एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र, मा. कपील पाटील केंद्रीय राज्यमंत्री, मा. भगवान कराड, केंद्रीय राज्यमंत्री, मा. देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र, मा. गणेशसिंग खासदार, मध्यप्रदेश, मा. राम मोहन नायडू खासदार आंध्र प्रदेश, मा. मारगाणी भारत खासदार आंध्रप्रदेश, मा. रामदास तडस खासदार, मा. बाळूभाऊ धानोरकर खासदार, मा. सुनीलकुमार पिंटू खासदार बिहार, डॉ. के.लक्ष्मण आमदार तेलंगणा, मा. बाडूगला लिंगा यादव, आमदार तेलंगणा, मा. राम चंदर जंगर, आमदार न्यू दिल्ली, मा. वादी रवीचंद्र आमदार तेलंगन, मा.मिसा भारती आमदार बिहार, मा. छगन भुजबळ माजी मंत्री, मा. हंसराज अहिर माजी केंद्रीयमंत्री, मा. नानाभाऊ पटोले, प्रदेशाध्यक्ष, मा. चंद्रशेखर बावनकुळे माजी मंत्री, मा. विजय जी वडेट्टीवार, माजी मंत्री, मा. जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री हे विशेष व्यक्ती उपस्थित असतील.
दुसऱ्या सत्रात मा.व्ही. ईश्वराईय्या यांचे अध्यक्षतेखाली मा. डॉ संजय कुटेमाजी मंत्री, मा. किसन पाठोरे आमदार, मा. व्ही.हनुमंत राव खासदार तेलंगणा, मा.राजकुमार सैनी, माजी खासदार हरियाणा, मा.मधू गौड खासदार तेलंगणा, मा. महादेवराव जानकर, माजी मंत्री, मा. जयंत पाटील माजी मंत्री, मा. अभिजित वंजारी आमदार, मा. साबीर अहेमद अन्सारी अध्यक्ष (AIMObcO), मा. जजुला श्रीनिवास गौड, आंध्रप्रदेश, मा. इंद्रजीत सिंग, मा. जशपाल सिंग खिवा, ओबीसी मोर्चा पंजाब, मा.जी. कारू नानिध्या तामिळनाडू, मा. डॉ विजय सोनकार शास्त्री माजी अध्यक्ष stsc कमिशन, आदी उपस्थित राहणार आहेत.
सर्व ओबीसी बंधुभगिनीनी मोठया संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले आहे.