Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मतदारसंघाचा विकास; कि स्वविकासासाठी "जोर" Constituency development; "Emphasis" on self-development



राज्यात सध्या मीडिया आणि सोशल मीडियावर एकच विषय चर्चिला जातोय तो म्हणजे सरकार पडणार कि राहणार आणि आज शिंदे गटात हे गेले आणि ते गेले. आता अशातच सध्या जिल्ह्यात एका चर्चेला उधाणआले ते म्हणजे आमदार किशोर जोरगेवार यांच्या गुवाहाटी जाण्याने.

कोणी म्हणताय २०० युनिट गेले, कोणी काय ? सध्या जोरगेवार नेटकऱ्यांच्या अग्रस्थानी असून अनेक अनेक नेटकरी त्यांच्या या निर्णयाची खिल्ली हुडविताना दिसत आहे . त्यावर जोरगेवार यांच्याकडून एक प्रेस नोट रिलीज करण्यात आली. त्यात ते म्हणतात, मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी सत्तेसोबत राहणे गरजेचे. यावरून हि ते नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले असून, सर्वांगीण विकास मतदार संघाचा की स्वतः च्या विकासासाठी "किशोरभाऊ जोर देत आहेत. काही जणांनी तर यांना दल बदलू गिरगिट अशी उपाधी दिली.

सुरवातीच्या सत्ता नाट्यात त्यांनी अगोदर हातात कमळ घेतले होते . बटन कोणतेही दाबा मत कमळालाच अशा पोष्ट व बातम्या वृत्तपत्रातून व्हायरल होताच जोरगेवारांनी पाय मागे घेत धनुष्यबाण हातात घेतला . आणि मतदार संघ सोडा मतदार संघाबाहेर मीच निधी आणला असा दिखावा बॅनरबाजी आणि सोशल मीडियात दिखावा करायला सुरवात केली. मजुकुर कॉपी पेस्ट करावा तसा कामाची सुद्धा कॉपी करण्यात ते पटाईत आहे. 

असो पण काल पर्वा झालेल्या राज्यसभा व विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी व विरोधकांनी भाव (म्हणजे पैसे नाही असा विचार करू नका ते घेतले असेल तर माहित नाही ) दिल्याने जोरगेवारांची छाती ५६ झाली होती. माझा मतदार संघातील कामे करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याने मी महाविकास आघाडी सोबत असल्याच्या प्रतिक्रिया जोरगेवार यांनी प्रसारमाध्यमांना दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत तसे फोटोही व्हायरल केले. मला निवडून दिल्यास २०० युनिट मोफत वीज देऊ अशी फसवी घोषणा करून जोरगेवार निवडून तर आले पण अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होऊन २०० युनिट तर सोडा पूर्ण बत्तीगूल केली.
 विरोधकांनी या विषयावर त्यांना धारेवर धरले होते. जिधर दम उधर हम ही भूमिका जोरगेवार यांची असल्याने लोक त्यांना जिथं खाऊ तिथं किशोरभाऊ अशी नवी उपाधी देण्यात आली. 

महाविकास आघाडीतील घटक पक्षातील एका मोठ्या नेत्याचे निकटवर्तीय असल्याने त्यांनीच त्यांना गुवाहाटी पाठविले नसेल, ना अशा चर्चा ही आता रंगू लागल्या आहेत . मध्यंतरी तो नेता ही नॉट रीचेबल असल्याच्या बातम्या चर्चिल्या जात होत्या. व्हाया सेना असा प्रवास या दोघांचीही झाल्याने शिंदे यांच्याशी संपर्क असेल, यात दुमत नाही. पण पक्षश्रेष्ठींना अंधारात ठेवून शिंदेंच्या 'विजयाची' माळ गुंफली जात नसेल ना अशी शंका जिल्ह्यात सुरू आहे. पण, किशोरभाऊ म्हणजे मोसम की तरह हम भी बदल जाते हैं, अशीच स्थिती झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies