त्वरित सकारात्मक कार्यवाही करण्याचे गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांचे आश्वासन..
चंद्रपुर शहरातील रामनगर पोलिस स्टेशनचे विभाजन करून शास्त्रीनगर पोलिस चौकीला पोलिस स्टेशनचा दर्जा द्यावा अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे.
या मागणी संदर्भात शासनाला पाठवलेल्या पत्रात चंद्रपूर शहरात असलेल्या रामनगर पोलिस स्टेशनवर जास्त अतिरिक्त भार निर्माण झाला आहे. रामनगर पोलिस स्टेशनची हद्द ही फार मोठी असल्याने शास्त्रीनगर पोलिस चौकीला नविन पोलिस स्टेशनचा दर्जा देणे आवश्यक आहे. रामनगर पोलिस स्टेशनमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता येथील काही भाग कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. सद्यस्थितीत शास्त्रीनगर पोलिस चौकी येथे पोलिस स्टेशनला आवश्यक असणारी इमारत ही तयार असून प्रस्तावित पोलिस स्टेशनकरिता चंद्रपूर शहरातील 22 वार्ड व 21 ग्रामीण गावे जोडणे प्रस्तावित आहे. त्याठिकाणी पोलिस अधिक्षक चंद्रपुर यांनी 23 डिसेम्बर 2020 रोजी शासनाला प्रस्ताव सादर केला आहे. 94 पोलिस अधिकारी/कर्मचारी यांच्या अतिरिक्त पदांची मागणी करण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे. या प्रस्तावाला शासनाची मंजूरी तातडीने मिळणे आवश्यक आहे अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात गृह विभागाचे अपर मुख्य सचिव श्री आनंद लिमये यांच्याशी चर्चा केली व सदर प्रस्तावाला मान्यता देण्याची विनंती केली . सदर प्रस्ताव तपासून त्वरित सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन श्री आनंद लिमये यांनी यावेळी दिले.