चंद्रपूर नागपूर महामार्गावरील पडोली चौकात “वाहतुक नियंत्रण सिग्नल” नसल्यामुळे अनेक अपघात झाले आहे. या अपघाताला आळा बसाव यासाठी भारतीय सेनेतून निवृत्त सैनिक मनोज वसंत ठेंगणे यांनी पडोली चौकात “वाहतुक नियंत्रण सिग्नल लावावे तसेच ,शॉपिंग कॉम्पलेक्स आणि मार्केटला जाणाऱ्यांची जास्त रहदारी असल्यामुळे पार्किंग आणि नो पार्किंग चे बोर्ड लावण्यात यावे, रोडच्या दोन्ही बाजूने पिवळे पट्टे मारुन रात्री चमकणारे रोड स्टँड लावण्यात यावे ,कोसारा चौक (शर्मा चौक) ते पडोली चौक या रस्त्यावरील स्ट्रिट लाईट परत पुन्हा सुरु करण्यात यावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देऊन मागणी केली मात्र झोपी गेलेल्या जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी माजी सैनिक मनोज वसंत ठेंगणे यांचे आज पासून पड़ोली चौका मध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू आहे असे ते यावेळी बोलत होते
पडोली चौकात “वाहतुक नियंत्रण सिग्नल” लावण्यासाठी माजी सैनिक मनोज ठेंगणे यांचे आमरण उपोषण
मे ०३, २०२२
0
Tags