Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

बाबुपेठ रेल्वे उडाण पूलासाठी 5.26 कोटी रु निधी मिळाल्याबद्दल भाजपतर्फे फटाके व ढोल ताशाच्या गजरात जल्लोष




आ. सुधीर मुनगंटीवार यांचे नागरिकांनी मानले आभार


चंद्रपूर :- विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपुर शहरातील बाबुपेठ रेल्वे उडाण पूलासाठी 5.26 कोटी रु निधी मंजूर करण्यात आला. या बद्दल आज बाबुपेठ परिसरामध्ये भारतीय जनता पार्टी तर्फे फटाके व ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला. चंद्रपुर शहरातील बाबुपेठ परिसरातील नागरिकांच्या जिव्हाळयाच्या या रेल्वे उडाणपुलासाठी निधी मंजूर झाल्याने बांधकाम प्रक्रियेला गती प्राप्त झाली आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वीही बाबुपेठ परिसरातील रस्ते विकाससाठी कोट्यवधींचा निधी दिलेला आहे. शासनाच्या नगरविकास विभागाने दि. २६ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार 5.26 कोटी रु. निधीला प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. या रेल्वे उडाणपुलासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने प्रयत्न केले आहे. अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात देखील त्यांनी यासाठी निधी मंजूर करविला.चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील बाबुपेठ रेल्वे उडडाणपुलाचे बांधकाम करण्‍याकरिता प्रशासकीय मान्‍यतेनुसार रेल्‍वेने वहन विभागाकडून रू. १६.३१ कोटी व चंद्रपूर महानगरपालिकेने रू.५.०० कोटी तसेच महाराष्‍ट्र शासनाकडून रू.४०.२६ कोटी असे एकूण ६१.५७ कोटी रूपयांचे बांधकामास शासनाने १५ फेब्रुवारी २०१६ अन्‍वये मंजूरी दिलेली आहे.

सन 2018 -19 मध्ये आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निधी जमा केला होता.जिल्हाधिकारी कार्यालयाने सदर निधी दिला नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा असलेला निधी आ. मुनगंटीवार यांनी नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांना सांगून द्याव्यास लावला आहे.नगरविकास विभागाच्या शासन निर्णय दिनांक ८ मार्च २०१९ नुसार ६७ कोटी रूपयांपैकी अखर्चित निधी फक्‍त २४ कोटी रूपये अद्यापही शिल्‍लक आहेत. त्‍यापैकी अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळाकडून दिनांक १७.१.२०२२ रोजी एकूण ८ कामांकरिता रू. १८ कोटी ७४ लक्ष निधी मंजूरी करिता तांत्रीक मान्‍यतेसह जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांच्या दिनांक १८.१.२०२२ च्‍या पत्रान्‍वये नगरविकास विभागाला प्रस्‍ताव सादर केलला आहे. त्‍यामुळे बाबुपेठ उडडाणपुलाच्‍या बांधकामाकरिता उर्वरित शिल्‍लक राहिलेला सन २०१८-१९ चा निधी रू. ५ कोटी २६ लक्ष निधी त्‍वरीत उपलब्‍ध करून देणे आवश्‍यक आहे. या बाबीकडे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे व प्रधान सचिव यांचे सातत्याने पत्रव्यवहाराच्या माध्यमातून लक्ष वेधले . या संदर्भात नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत निधी उपलब्ध करण्याबाबत विनंती देखील केली . आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे. हा निधी मिळवून दिल्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानण्यात आले. यावेळी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष मंगेश गुलवाडे, माजी उपमहापौर राहुल पावडे , भाजप बाबुपेठ मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, माझी नगरसेवक प्रदीप किरमे, माजी नगरसेविका कल्पना बागुलकर, माजी नगरसेवक श्याम कमकम, भावेश मातंगी, अमोल नगराडे, राजेश यादव, आकाश ठुसे,पराग मलोडे, दिवाकर पुढतवार, गणेश गेडाम,विजय मोगरेे,मुकेश गाडगे,रेखा चन्ने, बातो ताई,यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies