चंद्रपूर :- देशभरात महागाईचा वणवा पेटला आहे, यामध्ये सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत आहे. केंद्रातील भाजप सरकारने अच्छे दिनाचे गाजर दाखवत देशातील नागरिकांची महागाई वाढवत फसवणूक केल्याने या महागाई विरोधात युवासेनेचे राज्यव्यापी 'थाळी बजाओ' आंदोलन शहरातील जिल्हापरिषद समोरील पेट्रोल पंपा जवळ युवासेना जिल्हा समनव्यक विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात करण्यात आलं.
आज पेट्रोल ११८ रुपयांपेक्षा अधिक तर डिझेलने शंभरी पार केली आहे. घरगुती १००० व व्यावसायिक गॅसचे दर २५०० पर्यंत पोहचले आहे. भाजीपाला व औषधी घेणे अवघड होत आहे, यासाठी सर्वसामान्य जनतेचा आवाज केंद्रातील भाजपने ऐकावा. दोन वर्षांपूर्वी थाळी वाजून कोरोना पळाला होता, तसे थाळी वाजवून महागाई तरी कमी होईल, या अपेक्षेने युवासेने आंदोलन केलं. यावेळी युवासेना जिल्हा समनव्यक विक्रांत सहारे सह
जिल्हा चिटणीस विनय दुबे उपजिल्हाप्रमुख सुमित अग्रवाल शिवसेनेचे राहुल विरुटकर युवा सेना शहर प्रमुख प्रमोद नन्नावरे युवा सेना तालुका प्रमुख हेमराज बावणे युवा सेना उपशहर प्रमुख समीर मेश्राम युवा सेना उपशहर प्रमुख प्रफुल चौरे सह शेकडो युवासैनिक उपस्थित होते.