जगन्नाथ बाबा नगर परिसरातील देशी भट्टीच्या विरोधात
चंद्रपूर :-चंद्रपूर शहरातील जगन्नाथबाबा मठ परिसरातील चौकात राम सेतू पुलालगत नवीन देशी दारुभट्टी व बियर शॉपीला परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान याविरोधात जगन्नाथ बाबा नगर संयुक्त दारूबंदी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनही सुरू आहे. प्रशासनाला सुबुद्धी यावी, यासाठी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच परिसरातील विद्यार्थी व युवकवर्ग जिल्हाधिकारी यांना सदर दारु दुकान रद्द करावे, या मागणीचे पोस्टकार्डद्वारे विनंती पत्रही पाठविणार असल्याने जगन्नाथ बाबा नगर संयुक्त दारूबंदी समितीने कळविले आहे. तसेच आज ज्येष्ठ नागरिक संघाचे अनेक ज्येष्ठांनी सुद्धा या एल्गार आंदोलनांमध्ये येऊन आपला समर्थन असल्याचे सांगितले आहे ज्येष्ठ नागरिक संघासह अनेक संस्था व नागरिकांचा या एल्गार आंदोलनास पाठींबा मिळाला आहे.सदर दारुचे दुकान रद्द व्हावे यासाठी जगन्नाथ बाबा नगर संयुक्त दारूबंदी संघर्ष समितीच्या माध्यमातून येथील नागरिकांनी काही दिवसापासून एल्गार आंदोलन पुकारले असून सदर मागणीचे निवेदन प्रशासनास यापूर्वीच दिलेले आहे.
ज्येष्ठ नागरिक संघासह अनेकांचा समर्थन असल्याचे या परिसरातील दारु दुकानाला नागरिकांचा जोरदार विरोध होत असून ज्येष्ठ नागरिक संघाने जगन्नाथ बाबा नगर संयुक्त दारुबंदी संघर्ष समितीच्या एल्गार आंदोलनाला समर्थन दिले असून अनेक संस्था, संघटना व नागरिकांकडून आंदोलनाला समर्थन मिळत आहे. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशासनाचे याकडे लक्ष वेधत आहे