अनेक ठिकाणी उल्कापात दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान अनेकांनी उल्कापात होताना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात उल्कापात कैद केला असून सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.अनेक ठिकाणी ग्रामीण भागात ही तबकडी असल्याचे बोलल्या जातं आहे. पण नेमक काय आहे हे समजू शकले नाही.
मात्र चंद्रपूर पासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदेवाही तालुक्यात उल्कापिंड कोसळल्याचीही चर्चा आहे. या ठिकाणी मोठ्या आकाराच्या लोखंडी रिंग आकाशातून पडल्याची चर्चा आहे. खगोल अभ्यासकांनी हा पृथ्वीच्या कक्षेत आलेला उपग्रह असल्याची शंका वर्तवली आहे. चंद्रपूर व लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातही अशाच प्रकारे आकाशातून लाल झोत खाली कोसळत असल्याचे चित्र दिसले आहे.
प्रतिक्रिया
इलेक्ट्रॉन राॅकेट बुस्टरचेच तुकडे
न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:११ वाजता तेथील राॅकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन राॅकेट द्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या ४३० किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. आजच्या तारखेत केवळ एकाच राॅकेट उड्डाणाची नोंद असल्याने आज सायंकाळी उत्तर - पुर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या *इलेक्ट्रॉन राॅकेटच्या बुस्टरचेच असावेत...*
आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले.
दिसणार्या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही ही निश्चीत ..
श्रीनिवास औंधकर,
संचालक
एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबाद