Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

उपमहापौर राहुल पावडे यांच्या नेतृत्वात जनतेचा एल्गारजगन्नाथ बाबा नगरातील 'त्या' दारू दुकानांचा जनतेने केला निषेध

जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले निवेदन

जगन्नाथबाबा मठासारख्या पवित्र स्थळावरील चौकात राम सेतु पुलालगत नवीन देशी दारूभट्टी व बिअरशॉपी ला परवानगी देण्यात आली आहे.परवानगी देणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा तसेच राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचा तिव्र निषेध नोंदवून हे दोन्ही दुकान रद्द करण्यासाठी जगन्नाथ बाबा नगर येथील जनतेने उपमहापौर राहुल पावडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागास सोमवार 18 एप्रिलला निवेदन सादर केले.यावेळी भजपा उपाध्यक्ष अरुण तिखे,विहिपचे रोडमल गहलोत,राजूरकर,
पुण्यपवार,
श्रीमती मोरसकर,पाटील,
संजय निखारे,सुरेश हरीरामानी,चांद सय्यद
श्रीमती दिंडोकार यांचेसह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.
यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना उपमहापौर राहुल पावडे म्हणाले,राज्य सरकारच्या व पालकमंत्र्याच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यामुळेच नागरीकांना आता दारू दुकानांचा त्रास होतो आहे.चंद्रपुर महानगराचा अभ्यास केला तर,शहरात प्रवेश करताच चारही बाजूने सीमेवर दारू उपलब्ध आहे.जटपूरा गेट ते रामसेतु मार्ग वर देशी दारू,बियर बार व बियर शॉपीचा भरणा आहे.ही दुकाने सुरू असतांना नवीन दुकाने कशाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
नवीनतम दारूभट्टी व बियर शॉपी जगन्नाथ बाबा नगर मधुन हटविण्यासंदर्भात यावेळी भारतीय जनता पार्टी नगिनाबाग प्रभाग व सामान्य नागरीकांसमवेत जिल्हाधिकारी तथा राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.ही भट्टी रद्द होत पर्यंत लढा दिला जाईल अशी यावेळी घोषणा पावडे यांनी केली.
जगन्नाथ बाबा नगरातील हा परिसर नागरिकांच्या स्वास्थ्य समृद्धीसाठी महत्वाचा आहे.शहरातील बरेच नागरिक विशेषतः महिला व जेष्ठ नागरिक सकाळ संध्याकाळ येथे सुदृढ आरोग्यासाठी मार्गक्रमण करतात.ही दुकाने सुरू झाली तर याचा प्रचंड त्रास त्यांना सहन करावा लागणार आहे.अश्यात अनुचित प्रकार घडला तर यास जबाबदार कोण.?असा प्रश्न यावेळी नागरिकांनी उपस्थित केला.
या परिसरात फक्त जगन्नाथबाबांचे मठ नसून गायत्री शक्तीपीठ,बालाजी मन्दिर,कॉरमेल शाळा,किमान 5 मंगल कार्यलय(लॉन) आदी क्षेत्र आहेत.त्यामुळे ही येथे नागरिकांची वर्दळ असते.त्या मुळे कुठल्याही परिस्थितीत ही दुकाने रद्द करावीच लागेल,असे पावडे यांनी ठणकावून सांगितले.
या परिसरात अनेक धार्मिक आयोजन असते,श्री बालाजी मन्दिर येथे श्री बालजींचा विवाह सोहळा,गायत्री शक्तीपीठला विविध कार्यक्रम,जगन्नाथ बाबा मठात राम नवमी,हनुमान जन्मोत्सव,हनुमान जयंती आदि....या सर्व उपक्रमात महानगरातील सहभागी होतात.हे जगजाहीर असतांना,देशीदारू व बियर शॉपीची परवानगी देऊन जिल्हाधिकारी,पालकमंत्री व राज्य उत्पादन शुल्क विभाग नागरिकांच्या भावनांशी खेळ करत आहे.असाही आरोप उपमहापौर राहुल पावडे यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies