Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या स्‍वप्‍नांची पूर्तता करण्‍यासाठी झटणे हेच आपले कर्तव्‍य – आ. सुधीर मुनगंटीवारभारतीय जनता पार्टीने विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहीली आदरांजली

विश्‍वरत्‍न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान भारतमातेच्‍या चरणी अर्पण केले. या देशाला समर्पित केले. संविधानाच्‍या निर्मीतीमागे त्‍यांचे स्‍वप्‍न होते की समाजातील तळागाळातील व्‍यक्‍तीच्‍या चेह-यावर आनंद निर्माण व्‍हावा. मात्र आज स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षात जेव्‍हा आपण चिंतन करतो तेव्‍हा आजही हातावर पोट घेवून जगणा-या व्‍यक्‍तींना विवंचनांचा सामना करावा लागत आहे. आज जय भीमचा जयघोष करताना बाबासाहेबांचे स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी आम्‍हाला प्रयत्‍नांची शर्थ करायची आहे किंबहुना हे आपले कर्तव्‍य आहे, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


दिनांक १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंतीदिनानिमीत्‍त चंद्रपूर मनपा समोर आयोजित कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. मी अर्थमंत्री असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या लंडन येथील निवासस्‍थानासंदर्भात ४० कोटी रू. निधी मंजूर करण्‍याचा योग मला प्राप्‍त झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या १२५ व्‍या जयंतीनिमीत्‍त १२५ कोटी रू. निधीची तरतूद करण्‍याचे सौभाग्‍य मला लाभले. चंद्रपूरच्‍या पवित्र दीक्षाभूमीवर २ कोटी रू. निधी खर्चुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे बांधकाम केले. नुकताच या भवनात वॉटर कुलर, वातानुकुलीकरण, साऊंड सिस्‍टीम आदींसाठी ५० लक्ष रूपये निधी मंजूर करविला. विरोधी पक्षात असताना देखील या प्रक्रियेत मी माझे योगदान देवू शकलो याचे मला आनंद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजावर मोठे उपकार आहे. आपण त्‍यांच्‍या स्‍मृतीप्रित्‍यर्थ जे ही काही करू ते कमीच असल्‍याची भावना त्‍यांनी यावेळी बोलताना व्‍यक्‍त केली.


यावेळी बोलताना माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर यांनी आपल्‍या भाषणात सांगीतले की सामाजिक समरसतेचा सुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सदैव तळपत ठेवला. सर्वसामान्‍य जनतेला त्‍यांच्‍या हक्‍काची जाणीव व्‍हावी यासाठी संविधानाच्‍या माध्‍यमातुन मोठा ग्रंथ त्‍यांनी या देशाला दिला, असेही ते म्‍हणाले. यावेळी भाजपा चंद्रपूर महानगराचे अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, स्‍थायी समिती अध्‍यक्ष संदीप आवारी, महानगर महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, रवि गुरनुले, महिला मोर्चा अध्‍यक्ष सौ. अंजली घोटेकर, युवा मोर्चा अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, सभागृह नेत्‍या सौ. जयश्री जुमडे, गटनेते देवानंद वाढई, मनपा सदस्‍य राहूल घोटेकर, छबू वैरागडे, राजीव गोलीवार, रवि आसवानी, संजय कंचर्लावार, डॉ. दीपक भट्टाचार्य, सविता कांबळे, संगीता खांडेकर, शितल आत्राम, अरूण तिखे, अनुराधा हजारे, शिला चव्‍हाण, पुष्‍पा उराडे, वंदना जांभुळकर, चंद्रकला सोयाम, शितल गुरनुले, अनिल फुलझेले, खुशबु चौधरी, स्‍वामी कनकम, राजेंद्र अडपेवार, प्रदीप किरमे, सचिन कोतपल्‍लीवार, विठ्ठल डुकरे, रवि लोणकर, प्रज्‍वलंत कडू, यश बांगडे, राजकुमार आकापेल्‍लीवार, रेणु घोडेस्‍वार, पुरूषोत्‍तम सहारे, धनराज कोवे, विनोद शेरकी, प्रभा गुडधे, किरण बुटले, राजेंद्र खांडेकर, महेंद्र जुमडे, पुनम तिवारी, राजेश थुल, सागर भगत, निलेश हिवराडे, जितेंद्र वाकडे, वंदना संतोषवार, पुरूषोत्‍तम सहारे, चंदन पाल, चांद पाशा, रितेश वर्मा, गिरीधर येडे, संजय निखारे, प्रमोद क्षीरसागर, सतीश तायडे, राजेश यादव, आकाश ठूसे, सत्‍यम गाणार, गणेश रामगुंडेवार, संदीप देशपांडे, स्‍वप्‍नील कांबळे, सुरेश हरिरमानी, अमोल नगराळे, विक्‍की मेश्राम, बंडू गौरकार, चंद्रप्रकाश गौरकार, प्रविण उरकुडे आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies