Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

बल्लारपूरात फुटपाथ व्यावसायिकांना थंड पाण्यासाठी कुलजारचे वितरणरणरणत्या उन्हात व्यवसाय करणाऱ्यांना दिलासा

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील अभिनव उपक्रम

शेवटच्या माणसाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावा यात खरे समाधान : आ. सुधीर मुनगंटीवार


एप्रिल महिन्यातले रणरणत्या उन्हाची काहिली .....त्यामुळे होणारी कासावीशी ....उदरनिर्वाहासाठी फुटपाथवर बसून वस्तू विकणारे व्यावसायिक थंड पाण्यासाठी इकडे तिकडे जात असताना एका लोकोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना दिलासा मिळतो ......त्यांच्या हाती येते कुलजार .....या अभिनव अशा लोकोपयोगी उपक्रमाची संकल्पना अर्थातच माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची..... या अभिनव उपक्रमाची सुखद सुरुवात बल्लारपूरकरांनी राम नवमी च्या शुभदिनी अनुभवली.....


विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विकासकामांच्या झंझावातासह विविध लोककल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून जनतेची सेवा केली आहे. विशेषतः बल्लारपूर शहरात त्यांनी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन , दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकलिंचे वितरण , नेत्र चिकित्सा शिबिरे व त्या माध्यमातून मोफत चष्मे वितरण , मोतिबिंदू शस्त्रक्रिया , रेल्वे विभागाच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिरे असे विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून त्या माध्यमातून जनतेची सेवा आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.

फुटपाथवर बसून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी छोटे व्यवसाय करणारे नागरिक तीव्र उन्हाचा सामना करतात. त्यात आपला जिल्हा देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण जिल्हा . त्यांना थंड पाण्यासाठी 5 लिटरची कुलजार भेट द्यावी असे आ. मुनगंटीवार यांनी ठरविले आणि आज या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या आधीही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर शहरात हा उपक्रम राबविला आहे. आता पुन्हा एकदा हा उपक्रम हाती घेऊन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गरीब व्यावसायिकांना दिलासा दिला आहे.
आ. मुनगंटीवार यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी 5 लिटरच्या कुलजार चे वितरण
केले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, माजी नगराध्यक्ष हरिष शर्मा, शिवचन्द दिवेदी, जैनुद्दीन जव्हेरी, कशी सिंग, मनीष पांडे, आशिष देवतळे, रेणुका दुधे, कांता ढोके ,राजू दारी, जुम्मन रिजवी, इतर सर्व प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक आणि महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
तळागाळातील सर्वसामान्य जनतेची सेवा हा आमच्यासाठी केंद्रबिंदू असून याच मार्गाने आम्ही सेवेचे समाजकारण करत आहोत. शेवटच्या माणसाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावा व तो आपल्याला अनुभवता यावा यासारखे दुसरे सुख नाही. ही समाजसेवा अशीच अव्याहतपणे सुरू राहील, असे यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies