Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

भद्रावती हत्याकांडातील त्या तरुणीच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक
भद्रावती शहरातील ढोरवासा-पिपरी मार्गालगत सरकारी आयटीआय समोरील शेतात निर्वस्त्र, तरुणीचा मृत्यूदेह आढळून आला होता. तरुणीची ओळख पटवून एका विधी संघर्षग्रस्त बालक हिचेकडे गुन्हयाबाबत केलेल्या चौकशी मध्ये माहिती प्राप्त झाली आहे की. यातील मयत मुलगी व ती मैत्रीणी होत्या एकाच रूम मध्ये राहत होत्या काही महिण्यापासून वेगवेगळ्या करणामुळे आपसामध्ये भांडण होत होते. 


मयत मुलगी तिचा ईतर मित्रांसमोर अपमान करीत होती. त्यामुळे तिचे मनात मयत मुली बद्दल रोष निर्माण होवून तिला अद्दल घडवायची असा तिने निश्चय केला. तिने तिचा मित्राला हि गोष्ट सांगीतली दोघांनी एकत्रीत मयताला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने कट रचला. त्याप्रमाणे मयताला ताब्यात घेतलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाने दिनांक 03/04/2022 रोजी रात्री 08:45वा. वरोरा नाका येथे बोलवून घेतले. त्या ठिकाणावरून तिने व पाहीजे आरोपीने तिला मोटार सायकलवर बसवून घटनास्थळी घेवून गेले. रात्री 12:00 वा. सुमारास घटनास्थळी निर्जनस्थळी नेवून विधीसंघर्षग्रस्त बालकाने मयताला मारहाण करून जमीनीवर खाली पाडले नंतर तिचे पाय पकडून मांडीवर चाकूने दोन वार केले.. सदर वेळी पाहीजे आरोपी मयताचे पोटावर बसून प्रथम गळा दाबून खून केला. नंतर तिची ओळख पटू नये म्हणून दोघांनीही दोघांच्याही चाकूने आळी पाळीने मयताचा गळा कापला तसेच मयताचे पुर्ण कपडे व मुंडके घेवून मोटर सायकलवरून पसार झाले होते.  स्थानिक गुुने शाखेने मृतक युवतीच्या मैत्रिणीला ताब्यात घेतले होते.

तर काल रात्री बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर आणखी एका मारेकऱ्याला अटक करण्यात आली आहे. शंकर शेखर कुरवान ( वय 26) रा. भद्रावती असे आरोपीचे नाव आहे. काल रात्री बल्लारपूर रेल्वे स्थानकावर दुचाकी उभी करून तो केरळला पळून जाण्याच्या तयारीत होता. स्थानिक गुन्हे शाखेला सदर आरोपी पळून जाण्याचच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती.पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे व त्यांच्या पथकाने आरोपीला पकडून बेड्या ठोकल्या.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies