Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

परिवारातील व्यक्ती दारू व्यसन मुक्त झाल्याने त्या परिवारातील मुले डॉक्टर इंजिनिअर होतात - आमदार सुधिर मुनगंटीवारव्यसनमुक्ती च्या मेळाव्यात लोकांनी हजारोच्या संख्येने दारू व्यसन मुक्तीचा घेतला संकल्प


परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर च्या वतीने भव्य दारू व्यसनमुक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माननीय आमदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री व लोखलेख समिती प्रमुख हे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते.तर मा. श्री माजी आमदार वामनराव चटप कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय देवराव दादा भोंगळे माजी जि प अध्यक्ष माननीय चंदू पाटील मारकवार माजी अध्यक्ष संत गाडगेबाबा ग्रामीण स्वच्छता अभियान मा.नामदेव डाहुले तालुका अध्यक्ष भाजपा.मा.सौ शोभाताई पिदुरकर मा. महेश कोडावार ठाणेदार मा. मा. राकेश गौरकार मा. सौ स्नेहा ताई साव हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून परमपूज्य शेषराव महाराज, तुकडोजी महाराज गाडगे महाराज छत्रपती शिवाजी महाराज परम पुज्यनिय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण व मान्यवरांना शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन झाले. या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे उद्घाटक *मा.आमदार श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी दारू व्यसनामुळे कित्येक संसार उघड्यावर आले असून चंद्रपूर जिल्ह्यात दारू व्यसनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे . चंद्रपूर जिल्हा दारू व्यसन मुक्त करण्याकरता अशा प्रकारच्या कार्यक्रमांची गरज असून परम पूज्य संतोष महाराज व त्यांच्या संपूर्ण टीमचे त्यांनी आभार धन्यवाद मानले. दारू व्यसन सोडल्याने त्या घरात सुख समाधान तर येते परंतु त्या घरची मुले डॉक्टर इंजिनिअर होतात असे ते आपल्या मार्गदर्शनात बोलले* . या कार्यक्रमात माजी सैनिक यांचा शाल श्रीफळ व चंद्रपूर जिल्ह्यातील परमपूज्य शेषराव महाराज व्यसन मुक्ती संघटनेच्या सहा तालुक्यातील कार्यकारिणीच्या प्रमुख पदाधिका-यांचा दारू व्यसन मुक्त समाज घडविण्याच्या त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटीला परमपूजनीय संतोषजी महाराज यांच्या दारू व्यसन मुक्ति साठी आलेल्या लोकांना हजारोच्या संख्येने दारू व्यसन मुक्तीचा संकल्प घेतला. या कार्यक्रमाला पुरुष महिला वर्ग हजारोच्या संख्येने उपस्थित होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री.अनिल डोंगरे जिल्हा अध्यक्ष.श्री. श्री.लक्ष्मीकांत धानोकर जिल्हा उपाध्यक्ष.श्री. पंडित काळे जिल्हा कोषाध्यक्ष श्री दिगंबर वासेकर जिल्हा संघटक श्री अविनाश राऊत जिल्हा सचिव श्री सुरेश जीभकाटे जिल्हा सचिव श्री भालचंद्र रोहणकर जिल्हा प्रचारक श्री प्रकाश अगमकर जिल्हा सदस्य. श्री अरुण बावणे श्री नारायण खापणे सौ वंदना वर्भे श्री आकाश शिरसागर श्री बापूराव मुंगोले.श्री.श्रीकृष्ण पिंपळकर श्री देविदास कौरासे श्री उत्तम लडके श्री दिवाकर कोहपरे श्री अरविंद धानोरकर श्री कालिदास पाल श्री पुणेश पिंपळशेंडे श्री बंडू निब्रड श्री महादेव पिदुरकर श्री भगवती पिदुकर श्री हरिदास कौरासे श्री समीर देशकर श्री धीरज घुगुल श्री ईश्वर बोरसरे श्री सूर्य सूर्यभान जुनारकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रयत्नाची पराकाष्टा केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies