Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चंद्रपूर जिल्हा मध्‍यवर्ती सहकारी बॅंकेतील आर्थीक घोटाळयांची सखोल चौकशी करावी – भाजपाची मागणीनविन नोकर भरतीला स्‍थगिती देत प्रशासक नियुक्‍त करावा

चंद्रपूर :- जिल्हा मध्‍यवर्ती सहकारी बॅंकेतील आर्थीक घोटाळयांची सखोल चौकशी करण्‍याची मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्‍यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना पाठविण्‍यात आले आहे. प्रामुख्‍याने नविन नोकर भरतीला स्‍थगिती देत प्रशासक नियुक्‍त करावा अशी मागणी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे व महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केली आहे.

यासंदर्भात शासनाला पाठविलेल्‍या निवेदनात भाजपातर्फे म्‍हटले आहे की, राज्‍य शासनाच्‍या सहकार खात्‍याने चंद्रपूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बॅंकेला १६४ पदांच्‍या नोकर भरतीला मंजूरी देणे, याआधीची दोन नोकरभरती प्रकरणे वादग्रस्‍त ठरली आहे. या भरती प्रक्रियेत झालेल्‍या गैरव्‍यवहाराने अनेक बेरोजगार त्रस्‍त आहेत. बॅकेत अनेक आर्थीक घोटाळे झाले आहेत. शिवाय बॅंकेच्‍या संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. अशा परिस्‍थीतीत पुन्‍हा नोकर भरती देणे गैरव्‍यवहाराला आमंत्रण ठरेल. यामुळे या नोकर भरतीला तातडीने स्‍थगिती देण्‍याची नितांत आवश्‍यकता आहे. यापूर्वीच्‍या आर्थिक घोटाळयादरम्‍यान अध्‍यक्षाला तुरूंगात जावे लागले आहे. शेतक-यांच्‍या हिताचे निर्णय घेण्‍याऐवजी संचालकांनी आपले हितसंबंध जोपासत गैरव्‍यवहार करणे, संचालक मंडळाचा कार्यकाळ संपलेला असताना अद्याप प्रशासक बसविलेला नाही. सर्वोच्‍च न्‍यायालयाने जुन २०२१ मध्‍ये दिलेल्‍या आदेशात कार्यकाळ संपलेल्‍या बॅंकांवर प्रशासक नियुक्‍त करून निवडणूक घेण्‍याचे आदेश दिले असताना अद्याप प्रशासक नियुक्‍त करण्‍यात आलेला नाही. चंद्रपूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बॅंकेतील संचालक मंडळाने केलेल्‍या गैरव्‍यवहाराची सखोल चौकशी होवून दोषींवर कडक कारवाई होण्‍याची नितांत आवश्‍यकता आहे. शासनाचे याकडे अक्षम्‍य दुर्लक्ष होत आहे. त्‍यामुळे तातडीने नविन नोकर भरतीला स्‍थगिती देणे व प्रशासक बसविणे आवश्‍यक आहे, असेही भाजपातर्फे म्‍हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies