Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

वनविभागाच्या विरोधात सुरू असलेल्या उपोषणाला आज युवा सोशल फाउंडेशन ने जाहीर पाठिंबा व समर्थन दिलेचंद्रपूर:- काही दिवसांपूर्वी एका ५ वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले . त्याच्या काही कालावधीनंतर एका कामगारावर वाघिनीने हल्ला करून जखमी केले . परवा प्रकल्पातील एका कामगारावर वाघाने हल्ला करून ठार केले . याच घटनेच्या अनुषंगाने वन विभागाकडे वारंवार निवेदने देऊनही कोणत्याही उपाययोजना नाही केल्या , एका कामगाराला वाघाने ठार केल्याची घटना ताजी असताना काल देखील एका १६ वर्षाच्या मुलाला बिबट्याने जंगलात उचलून नेले .


सर्व कामगार ज्या प्रकल्पात काम करतात त्या प्रकल्पात जवळपास ६ मोठे वाघ असल्याची अधिकृत आकडेवारी काल वन विभागाने जाहीर केली . यामुळे सर्व कर्मचारी , कामगारांमध्ये तसेच सभोवतालच्या नागरिकांमध्ये अस्वस्थतेच व भीतीचे वातावरण असून नितीन भटारकर यांच्यातर्फे सुरू केलेल्या उपोषणाला , आंदोलनांना युवा सोशल फाऊंडेशन ने जाहीर पाठिंबा व समर्थन दिले ..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies