उपमहापौर राहुल पावडेंच्या कार्यालयात स्वांतत्र्यवीर सावरकर स्मृतीदिन
चंद्रपूर.
जगन्नाथ बाबा नगर येथील चंद्रपूर मनपाचे उपमहापौर राहुल पावडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतिदिनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपमहापौर राहुल पावडे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सावरकरांचे फार मोठे योगदान आहे. म्हणुनच त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी आम्ही ईथे एकत्र आलो आहोत. त्यांनी परदेशात इंग्लंड मध्ये असतांनाही देशासाठी लढा दिला. विद्यार्थी, युवा व जेष्ठ अवस्थेतही त्यांनी हा लढा अव्याहत सुरू ठेवला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशभक्तीचा जो परिचय दिला आहे, तो आम्हा सगळ्यांना प्रेरणादायी आहे. असा देशभक्त ज्यांनी कुटुंबाची संपूर्ण मालमत्ता स्वातंत्र्याच्या धगधगत्या यज्ञकूंडात देशासाठी अर्पण केली. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांचे कुटुंब युवकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मृतीदिना निमित्य अभिवादन करतांना आजच्या युवकांनी सावरकरापासुन राष्ट्रभक्तीची प्रेरणा घ्यावी, असे मत उपमहापौर राहुल पावडे व्यक्त केले.
याप्रसंगी उपमहापैर राहुल पावडे, भाजपा शहर सचिव रवी जोगी, संजय निखारे, सत्यम गाणार, महेश राऊत, सचिन बोबडे, अक्षय शेन्डे, अमित गौरकार, अमोल मत्ते, आदित्य डवरे, मयुर जोगे, विरेंद्र पिपरिकर यांची उपस्थिती होती.