राष्ट्रीय पेयजल योजना ग्रामीण भागासाठी वरदान- ब्रिजभूषन पाझारे
चंद्रपूर तालुक्यातील लहूजीनगर येथे ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुविधेकरीता महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नातून राष्ट्रीय पेय जल योजना अंतर्गत 57.78 लक्ष रुपयाची तरतूद करण्यात आली आहे त्यामध्ये विहीर, बोअरवेल पम्प, 50 हजार लिटर पाणी क्षमतेची पाणी टाकी व 5 किमी पर्येंत पाइप लाईन बसवण्याचे कार्य पूर्ण होणार असून मार्च महिन्यापर्यंत नागरिकांना राष्ट्रीय पेय जल योजनेचा लाभ मिळणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातुन जिल्हा परिषद सदस्य तथा माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभुषन पाझरे यांनी माहिती दिली त्यांनी पुढे सांगितले आहे की ही योजना ज्या वेळी पूर्णत्वास येईल त्यावेळी ह्या योजनेचा लाभ संपूर्ण गावकऱ्यांना मिळणार असून ही योजना गावकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच लहुजीनगर येथील गावकऱ्यांनी महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले माजी समजाकल्याण सभापती ब्रिजभूषन पाझारे यांनी येथील नळ योजनेची पाहणी केली यावेळी शाखा अभियंता कुणाल मेश्राम, सरपंच कांबळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती