भद्रावती :- स्व. मा.श्री बाळासाहेबांच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या शिकवणीनुसार शिवसेनेच्या युवती सेना शाखा भद्रावती च्या माध्यमातून शिवसेना जनसंपर्क कार्यालय भद्रावती येथे सफाई कामगार महिलांना बोलावून तसेच भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रेत्या महिलांसोबत हळदी कुंकवाचा कार्यक्रम श्री नंदू पढाल शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक यांच्या मार्गदर्शनात तसेच युवती सेनेच्या शिव गुडमल उपजिल्हा अधिकारी यांच्या नेतृत्वात महिलांना साखरेचे वाण व मिठाई वाटून साजरा करण्यात आला. याप्रसंगी सौ. नेहा बनसोड तालुका अधिकारी, सौ. सीमा लेडांगे तालुका समन्वयक, सौ. कल्पना भुसारी तालुकाप्रमुख तसेच असंख्य महिला उपस्थित होत्या.
"सफाई कामगार व भाजीपाला विक्रेते महिला सोबत साजरा केला हळदी कुंकवाचा कार्यक्रम"
फेब्रुवारी ०१, २०२२
0
Tags