चंद्रपूर :- पंडित दिनदयालजी उपाध्या यांच्या पुण्यतिथीनिमित्त इंदिरानगर मध्ये भारतीय जनता पार्टी तफे॑ नगरसेविका सौ. चंद्रकला ताई सोयाम यांच्या नेतृत्वात मेरा बूथ सबसे मजबूत हा कार्यक्रम सोयाम यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय जनता पक्षाचे मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, महिला मोर्चा उपाध्यक्ष भारती दुधाने, उत्तर भारतीय जिल्हाध्यक्ष रुद्रनारायण तिवारी,भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनोज पोतराजे, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आकाश मस्के, माजी नगरसेवक डॉ. गिरिधर येडे यांच्या उपस्थितीमध्ये इंदिरानगर येथील महिलांचा व युवकांचा भाजपचे दुपटे व यशोगाथा देऊन पक्षप्रवेश करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांनी सर्व पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन व पंडित दिनदयालजी उपाध्या यांच्या जीवणावर उल्लेखनिय मार्गदर्शन केले. यावेळी बूथ प्रमुख सुरज सोयाम, पूजा पुंडे, गीता पिंपळकर, सायरा बानू, मेगा वरघंटीवर, यांच्यासह इंदिरानगर तील कार्यकर्ते उपस्थित होते
नगरसेविका चंद्रकला सोयाम यांच्या मार्गदर्शनात शेकडो कार्यकर्त्यांच्या भाजपात प्रवेश
फेब्रुवारी १२, २०२२
0
Tags