Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

देशाचं भाग्य राजकारणच ठरवत असते..आ.मुनगंटीवार300 बुथवरील भाजपात प्रवेश कार्यक्रमात नवंमतदारांचा सत्कार.

चंद्रपूर :- देशात 2500 च्यावर राजकीय पक्ष आहेत.परंतु,फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमधेच कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी कार्य केले जाते.इतर पक्षात मात्र परिवारातील सदस्यांना प्राधान्य असते.भाजपात आई वडिलांचे कार्य कर्तृत्व बघून उमेदवारी दिली जात नाही.त्यामुळे भाजपात सर्वांना समान संधी आहे.राजकारण चांगल्या लोकांचं काम नाही हा विचार काँग्रेसच्या प्रदीर्घ सत्ते नंतर रुजला.हे दुर्भाग्यच.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून नवीन भारताचे निर्माण कार्य सुरू आहे.देशाचे भाग्य राजकारणच ठरवत असते,असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष,माजी अर्थमंत्री आ सुधीर मुनगंटीवार यांनी केले.ते भारतीय जनता पार्टी महानगर,नगीनाबाग प्रभाग,अग्रसेंन भवन येथे पंडित दीनदयाल उपाध्याय पुण्यतिथी निमित्य आयोजित "भाजपात प्रवेश व नवंमतदारांचा सत्कार कार्यक्रमात शुक्रवार(11 फरवरीला) कार्यक्रमाचेअध्यक्ष व उदघाटक म्हणून बोलत होते.

यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष(ग्रा) देवराव भोंगळे,जिल्हाध्यक्ष(श) डॉ मंगेश गुलवाडे,संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,महासचिव ब्रिजभूषण पाझारे,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,उपमहापौर राहुल पावडे,स्था.समिती सभापती संदीप आवारी,गटनेते देवानंद वाढई,नगरसेवक प्रशांत चौधरी,सविता कांबळे,वंदना तिखे यांची उपस्थिती होती.
आ.मुनगंटीवार म्हणाले,पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी सम्पूर्ण जीवन राष्ट्राला समर्पित केले.हा देश एक परिवार आहे असे ते म्हणत.त्यांचे प्रमाणे आपली प्रत्येक कृती देशसेवेसाठी समर्पित असावी.असे ते म्हणाले.यावेळी जेष्ठ नागरिक,नवं मतदार यांचा सत्कार व शेकडो नागरिकांना भाजपाचा दुपट्टा,टोपी व विकासगाथा आ मुनगंटीवार यांचे हस्ते प्रदान करून भाजपात प्रवेश देण्यात आला.प्रवेश घेणाऱ्यात अमित शेंडे,मिलिंद आवारी,प्रकाश राजूरकर,प्रफुल्ल झाडे,राहुल निखाडे,प्रकाश गोंनाडे यांचा समावेश होता.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व डॉ मंगेश गुलवाडे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमहापौर राहुल पावडे यांनी तर संचालन सत्यम गाणार यांनी केले.संजय निखारे यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी संजय निखारे,महेश राऊत,पियुष लाकडे,पंकज भडके,प्रियंका चिताडे,प्रमोद क्षीरसागर,स्वाती देवाळकर,भूषण पवार,सत्यम गाणार,सुशांत आक्केवार,सचिन बोबडे,अक्षय शेंडे,रवी जोगी व शिवांश शर्मा यांनी परिश्रम घेतले.


200 लाभार्थ्यांना मिळाले ओळखपत्र

भाजपात शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतल्या नंतर 42 लाभार्थ्यांना श्रमिक कार्ड,110 मतदारांना वोटिंग कार्ड,44 लाभार्थ्यांना रेशन कार्ड,44 लाभार्थ्यांना धान्यकीट,50 लाभार्थ्यांना ओळखपत्र व जीवनावश्यक साहित्य वाटप,करण्यात आले.

300 बुथवर झाले आयोजन

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करतांना महानगरातील 300 बुथवर भाजपात प्रवेश व नवंमतदारांचा सत्कार 5 मंडळात घेण्यात आला.किमान 3 हजार लोकांनी आ.मुनगंटीवार यांच्या विकासशील नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश घेतला.जिल्हाध्यक्ष डॉ गुलवाडे यांच्या नेतृत्वातील चमूने सर्व बुथवर भेट देऊन बूथ प्रमुखांचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies