प्रा. डॉ. कैलास व्हि. निखाडे , निर्सग अभ्यासक
भामरागड:- आदिवासी समाज हा अतिप्राचीन मुळ भारतीय समाज आहे. एकेकाळी भारतीय वनसंपत्तीचा मालक असणारा हा समाज इंग्रजांच्या आर्थिक शोषणामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल बनत गेला. आदिवासी म्हणजे आदिकाळापासुन वास्तव्य असणारा समुह होय. आदिवासी समाज हा निसर्गपूजक आहे. त्यांचे देव, भाषा आणि चालीरीती अन्य ग्रामीण आणि शहरी लोकांपेक्षा भिन्न असतात. जंगलात राहणारे काही आदिवासी तेथील उत्पादने शहरांत आणून विकतात. राज्यातील बहुसंख्य आदिवासी विशेषत: ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगांव, पुणे, नांदेड, अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्हयातील आदिवासी हे वन क्षेत्राभोवती व जवळपास राहतात. राज्यात एकूण 63867 चौ.कि.मी. भूभाग वनव्याप्त असून हा भाग राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या 21 टक्के एवढा आहे व यापैकी 31277 कि.मी. म्हणजे 49 टक्के क्षेत्र आदिवासी उपयोजना क्षेत्रात येते. सबब, आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक विकासात वनविषयक कामे महत्वाची भूमिका बजावतात. हया कामामध्ये मुख्यत्वे मुख्य व गौण वनोत्पादने घेणे वनीकरण आणि रोपांची लागवड वन्य पशुजीवन आणि निसर्ग संवर्धन संरक्षण इत्यादी कामाचा समावेश होतो. व pkनात मोठया प्रमाणात उपलब्ध असलेली वनोत्पादने वन विभाग जंगल कामगार सहकारी संस्थाए महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ वन विकास महामंडळ इत्यादी मार्फत पुरविला जाणारा रोजगार इत्यादीद्वारे उपलब्ध होणाऱ्या रोजगारावर आदिवासींची आर्थिक परिस्थिती मोठया प्रमाणात अवलंबून आहे. म्हणून आदिवासी निरनिराळया वन विषयक योजनांवर कामे करुन मजुरी कमवितात. त्यामुळे आदिवासीभागात फारच कमी प्रमाणात औद्योगिकरण झालेले दिसून येते. आदिवासीभागात निसर्गाने दिलेली नैसर्गिक वन संपत्ती आज हि त्यांच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांनी या संपत्तीचे अनेक वर्षापासून काळजी घेऊन जोपासना केलेली दिसून येते. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आजही आदीवासीभागात पांरपांरीक पध्दतीने शेती केली जाते. जंगलातील वनसंपत्तीचा उपयोग पांरपारीक पध्दतीने केली जात आहे. कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया करुण उद्योगधंदे करीत नाही. औद्योगीकरणामुळे देशाचा विकास ni होतो. पण आदिवासी भागात औद्योगिकरणाचा अभाव असून सुध्दा देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण करुण आदिवाशी भागाने देशाच्या विकास केलेला आहे.
प्रा. डॉ. कैलास व्हि. निखाडे ,निर्सग अभ्यासक 9403510981