Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चर्चा चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचीराज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाचे पोपट कार्यकर्ते पक्ष बदलण्याच्या तयारीत

चंद्रपूर :- महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. कधीही न सक्रिय असणारे कार्यकर्ते पुन्हा एकदा सक्रिय झाले असून यांच्यातर्फे अनेक योजनेचे कॅम्प लावल्या जात आहे आरोग्य शिबीर,रक्तदान शिबीर घेण्यात येत आहे. बॅनर बाजी व पोस्टरबाजीला सध्या उत आला आहे. तर काही कार्यकर्ते उमेदवारीसाठी पक्ष बदलण्याच्या तयारीत आहे. तर इंदिरा नगर येथील राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाचा पोपट कार्यकर्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षात सक्रिय राहायचा त्याला त्या पक्षात कोणी विचारत नसून तो इंदिरा नगर मध्ये कामाने नाही तर तोंडाने मोठमोठ्या गोष्टी करण्यात समोर आहे आता हा कार्यकर्ता निवडणूक लढविण्यासाठी पक्ष बदलवण्याचा तयारीत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे हा पोपट कार्यकर्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून आजवर भाजप, मनसे, व जिल्ह्यातील नेत्यांवर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नुसती टीका करायचा. तो आता इंदिरानगर च्या एका  कार्यकर्त्यांसोबत आपल्या दोन-तीन साथीदारांसह चंद्रपूर महानगरातील युवा आघाडीच्या शहरातील एका वार्डातील नगरसेवका सोबत महानगरातील नेत्याकडे पक्षात येतो उमेदवारी आम्हाला द्या असं म्हणत गेला होता. परंतु हा पोपट ज्या नेत्यांकडे गेला होता ते नेते निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बाजूने नेहमी उभे राहाले आहे. ज्या पक्षाकडून उमेदवारी मागण्यासाठी गेला होता त्या पक्षाचे कार्यकर्ते इंदिरा नगर मध्ये अनेक वर्षापासून पक्षात सक्रिय असून ते जनतेची सेवा करीत आहे. आता सर्व राजकीय पक्षांनी महानगरपालिकेची उमेदवारी देताना स्थानिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या विचार करावा तरस पक्ष वाढेल उमेदवारी मागण्यासाठी बेडका सारख्या उड्या मारणाऱ्या पोपट कार्यकर्ते निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय होत असतात यांच्यासोबत चार नागरिक प्रेमाने बोले की आपण निवडून येतो असच वाटू लागते. जनतेने सुद्धा मतदान करताना आज पर्यंत या उमेदवारांनी प्रभागात व जनतेसाठी पाच वर्ष काय केले आहे याचा विचार करावा.

विशेष म्हणजे बेडूक उड्या घेणाऱ्या पोपटाने आजवर समाजहिताचे एकही काम केले नाही. इतकच नाही तर कोरोना काळामध्ये या बेडकाने किती गरीब लोकांना मदत केली याचा हिशोब इंदिरानगर च्या जनतेकडे आहे. तिकीट मिळाली तर आम्ही पाडू अशी चर्चा सध्या रंगलेली आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies