जगदंब शिव सार्वजनिक उत्सव समिती श्यामनगर तर्फे शिवजन्मोत्सव निमित्त छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन व शिव मिरवणूक कार्यक्रम संपन्न
चंद्रपूरा :- जगदंब शिव सार्वजनिक उत्सव समिती श्यामनगर चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित ३९२ व्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी मंचावर महापौर सौ. राखीताई कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, महानगराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महानगर संगठन महामंत्री राजेंद्र गांधी, मनपाच्या गटनेत्या सौ. जयश्रीताई जुमडे, महानगर महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, प्रकाश धारणे, महानगर ओबीसी मोर्चाचे विनोद शेरकी, मनोरंजन राॅय, डॉ. तावाडे, दिलीप मंडल, गुरुपद मंडल, डॉ. मनोज कुपरणे, यावेळी छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य शिव मिरवणूक काढण्यात आली. यासोबतच भाजपा महानगराच्या सचिव सौ. सारीकाताई संदुरकर यांची सामाजिक कार्याची ओढ बघता भाजपने त्यांच्याकडे प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनेच्या महानगर प्रमुखाचे दायित्व दिले त्यानिमित्तं त्यांचा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उद्घाटन भाषणामध्ये देवराव भोंगळे यांनी शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली स्वराज्य उभ केलं. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, सर्वसमावेशक व सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही छत्रपती शिवराय वंदिले जातात. तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, बलाढ्य मुघल साम्राज्यशाही, पोर्तुगीज आणि डच ह्यांच्याशी महाराजांनी शेवटपर्यंत लढा दिला, त्यांच्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली. अशा कित्येक पैलूंमुळे महाराजांनी उत्तम शासनाचे सर्वोच्च उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले आहे. आपल्या उद्घाटनपर भाषणात मत व्यक्त केले.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पोतराजे, आशिष ताजणे,बळीरामजी शिंदे, सौ. ज्योतीताई ऊगेमुगे, सौ. कविताताई जाधव, सचिन संदुरकर, कृष्ण कूंडू, महेंद्र वाघाडे, रवी जोगी, आकाश मस्के आदिंसह शिवभक्त बंधूभगिनीं, बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.