नगीनाबाग प्रभागात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झाले ओपन स्पेसचे भूमिपूजन
चंद्रपूर :- महानगरात विकास कामांची शृंखला सुरू असतांना,नगीनाबाग प्रभागातील रेव्हेन्यू कॉलोनीत ही पण आमच्या यादीत अग्रस्थानी आहे.येथील जनतेने भरभरून आशीर्वाद दिला,म्हणून आज उपमहापौर झालो.आणि म्हणूनच विकासाची गंगा आपल्या प्रभागात आली.त्या अनुषंगाने आज या कॉलोनीतील ओपन स्पेसच्या सौंदर्यीकरणाचा शुभारंभ होत आहे.हे कार्य लवकरच पूर्ण करू.,विकासकामांमुळे नगीनाबाग प्रभाग सुंदर व सुसज्ज होऊ लागला आहे,असे प्रतिपादन उपमहापौर राहुल पावडे यांनी केले.ते भाजपा प्रणित चंद्रपूर शहर महानगरपालिका निधी अंतर्गत मंजूर 23 लक्ष 56 हजार 540 रू. किमतीचे,नगीनाबाग प्रभाग क्र. 09 मधील रेव्हनी कॉलनी येथील ओपन स्पेस च्या सौदर्यीकरणाच्या बांधकामाच्या भुमिपूजन सोहळ्यात बोलत होते. वार्डातील जेष्ठ नागरिकांच्या यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले.यावेळी,नगरसेवक प्रशांत (बंटी) चौधरी,नगरसेविका सविता कांबळे,वंदना तिखे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. उपमहापौर राहूल पावडे म्हणाले,विकास पुरुष आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व महापौर राखी कंचर्लावार यांच्या नेतृत्वात शहराचा विकास सुरू आहे.भाजपाला सेवेची संधी मिळाली म्हणूनच आ.मुनगंटीवार यांनी विकासाची गंगा खेचून आणली.जनतेचा आशीर्वादाचे ऋण आम्ही कधीच फेडू शकत नाही.100% समाजकारण हे सूत्र कोरोना काळापासून आम्ही अंगिकारले असे ते म्हणाले.
यशस्वीतेसाठी भाजपा महामंत्री संजय निखारे महेश राऊत,अक्षय शेंडे,,सचिन लगड,प्रविण वाटकर,मयुर जोगे,अमित गौरकार ,सचिन बोबडे,पियुष लाकडे, यांनी परिश्रम घेतले.या प्रसंगी परिसरातील मातृशक्ती व युवाशक्तीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.