Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

अमृत पाणी पुरवठा योजना ही चंद्रपूरसाठी जीवनदायिनी – आ. मुनगंटीवारशितलामाता मंदीर परिसरात अमृत योजनेचे उद्घाटन

देशगौरव भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रभाई मोदी यांनी देशातील नागरिकांसाठी अन्‍न, वस्‍त्र, निवारा, आरोग्‍य व पाणी या मुलभूत गरजा सर्वांपर्यंत पोहचाव्‍या यासाठी विविध योजना सुरू केल्‍या व यशस्‍वीपणे राबविल्‍या व अजूनही सुरू आहेत. यातील पाणी हे देशातील प्रत्‍येक घरापर्यंत पोहचाव्‍या यासाठी अमृत पाणी पुरवठा योजना सुरू केली. त्‍याचाच एक भाग म्‍हणून चंद्रपूर शहरालाही अमृत योजनेचा निधी मिळाला व शहरात ठिकठिकाणी अमृत योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. आज शितला माता मंदीर परिसरात अमृत योजनेची सुरूवात करताना मला अतिशय आनंद होत आहे, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. अमृत पाणी पुरवठा योजना ही चंद्रपूरसाठी जीवनदायिनी ठरेल याची मला पूर्ण खात्री आहे, असेही आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले.

या प्रभागाचे नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, त्‍यांची पत्‍नी व त्‍यांच्‍या बरोबर काम करणारी कार्यकर्त्‍यांची फौज ही सतत जनसेवेसाठी झटत असते. समाजसेवा जास्‍त व राजकारण कमी या भाजपाच्‍या धोरणांवर सुभाष पुरेपुर अंमल करतो ही अतिशय आनंदाची गोष्‍ट आहे. २०१७ च्‍या मनपा निवडणूकीच्‍या वेळेला मी असे आश्‍वासन दिले होते की या प्रभागातील चारही नगरसेवक निवडून आले तर या प्रभागाला मी ५ कोटी रूपये देईन. मला अतिशय आनंद होतो आहे की मी यापेक्षा जास्‍त निधी देवू शकलो. चंद्रपूर नगर परिषद असताना त्‍यातील १३२ वर्षांपैकी १२५ वर्षे एकाच पक्षाची सत्‍ता होती. त्‍यामुळे विकास खोळंबला होता. मात्र मनपात मागील ५ वर्षापासून भाजपाची शुध्‍द सत्‍ता आहे. त्‍यामुळे विकासाची गंगा घरोघरी पोहचविण्‍याचे काम मनपाचे पदाधिकारी व नगरसेवक करीत आहेत.

पूर्वी पैसा पाण्‍यासारखे खर्च करायचे, परंतु आता पाणी पैश्‍यासारखा खर्च करायची वेळ आली आहे. पाणी मुबलक उपलब्‍ध झाले तरीही ते अतिशय सांभाळून वापरावे असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी यावेळी केले. विकासाचा गोवर्धन हा कधिही एकटयाने उचलला जात नाही. सुभाषला या भागातील नगरसेवक व प्रभागातील नागरिक यांचा भरघोस प्रतिसाद नेहमीच मिळत असतो. सर्वांनी मिळून राजकरण विसरून परिसराचा विकास करावा असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी यावेळी केले.

याप्रसंगी प्रास्‍ताविक सुभाष कासनगोट्टूवार यांनी केले तर महापौर राखीताई कंचर्लावार व डॉ. मंगेश गुलवाडे यांनी यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन मंजूषी कासनगोट्टूवार यांनी केले. कार्यक्रमाला नगरसेविका शिलाताई चव्‍हाण, मायाताई मांदाळे, मायाताई उईके, भाजपा महानगर कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, प्रज्ञाताई गंधेवार, पुरूषोत्‍तम सहारे, वसंतराव धंदरे, अमीन शेख, विजय चिताडे, जितेंद्र वाकडे, सौ. वामीनाताई मेंढे, सुयोग लिहीतकर, सचिन खेडेकर, शाहनियाज खान, डॉ. देवराव मस्‍के, शुभम मेश्राम, धर्माजी मेश्राम, रत्‍नकांत दातारकर, वासुदेव भोई व प्रभागातील प्रचंड संख्‍येने उपस्थित होते. याप्रसंगी अमृत योजनेचे एक मॉडेल आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना प्रभागातर्फे भेट देण्‍यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies