रहेमत नगर प्रभागात सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचा भूमिपूजन सोहळा
चंद्रपूर :- जात, धर्म, पंथ, भाषा, रंग याही पलिकडे जावून भारतीय जनता पार्टीने नेहमीच सर्वसमावेशक विकासाचे काम केले आहे. याचीच फलश्रृती म्हणून चंद्रपूर महानगरात माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात विकासाचा रथ अग्रेसर झाला आहे. त्यामुळे शहराचा सर्व समावेशक विकास हेच आमचे ध्येय धोरण असल्याचे प्रतिपादन मनपाचे उपमहापौर राहुल पावडे यांनी केले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून नगीनाबाग प्रभागात विकास कामाची शृंखला सुरू असताना प्रभागातील शकील भाई ते सिव्हरेंज ट्रीटमेंट प्लांट पर्यंत रु .19 लक्ष 75 हजार 328 रुपये किमतीचे सिमेंट काँक्रिटीकरण रोड बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी उपमहापौर राहुल पावडे बोलत होते. यावेळी राहुल पावडे यांच्या हस्ते या विकासकामाचे विधीवत भूमिपूजन करण्यात आले.
पुढे बोलताना उपमहापौर राहुल पावडे म्हणाले की, शहरात विविध निधीच्या माध्यमातून विकासकामाचे सत्र सुरू आहे. माजी अर्थमंत्री व लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात संपूर्ण महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले. चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच प्राधान्याने प्रयत्न केले. चंद्रपूर नगरीला अव्वल स्थानी पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मी चंद्रपूर शहराच्या तसेच नगीनाबाग प्रभागाच्या विकासासाठी कार्यरत आहे. नगीनाबाग प्रभागात सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे काम सुरू असून कुठलाही भेदभाव न ठेवता सर्वसमावेशक विकास साधून सर्व नागरिकांना सोबत घेवून प्रभागाची प्रगती साधण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे यावेळी राहुल पावडे यांनी सांगितले. कार्यक्रमाला मनपाचे नगरसेवक बंटी चौधरी, नगरसेविका सविता कांबळे, वंदनाताई तिखे, रविजी जोगी संजय निखारे चांद सय्यद करीम भाई, सिराज काजी सबिर भाई सिराज पठान सकील भाई महेश राऊत, अक्षय शेंडे अमित गौरकार अमोल मते, वीरेंद्र पिपरीकर, मंगेश भटकर यांच्यासह वार्डातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.