बँक ऑफ इंडिया वरोरा येथील घटना
वरोरा : येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या बँक ऑफ इंडिया येथील रोखपालाची नजर चुकवीत दोन अज्ञात इसमानी 16 लाखांची रक्कम लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.
वरोरा शहरातील मुख्य बाजारपेठेत वर्दळीच्या बँक ऑफ इंडिया वरोरा ची शाखा आहे. या बँकेत शहरातील मोठ्या व्यावसायिकांचे शासकीय कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात खाते आहे. ही बँक एका गल्लीत असुन या बँके समोर खातेदाराच्या रांगाच रांगा लागलेल्या असतात.
तर बँकेच्या प्रवेशद्वारावरच बँकेचा सुरक्षा रक्षक असतो. असे असतांना ही सोमवारला दुपारी तीन वाजता चे दरम्यान बँकेतील रोखपाला ची नजर चुकवून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे सोळा लाख रुपयाची रक्कम लंपास केल्याचे रोखपालाच्या लक्षात येताच तात्काळ ही माहिती शाखा व्यवस्थापकाला दिली आणि एकच खळबळ उडाली.
घटनेची तोंडी माहिती शाखाधिकारी श्याम अत्तरगडे यांनी पोलिसांना देताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून तपास कार्याला सुरु केली असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.