आपापले लोकांना समोर करून स्वताचे नाव मनसे नेत्यांपुढे रेटनारेच खरे आहे का?
चंद्रपूर प्रतिनिधी :- मागील अनेक वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा नेत्रूत्वात फेरबदल करण्यासाठी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या निर्देशानुसार पक्षाचे नेते अभिजित पानसे, सरचिटणीस तथा कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण व महाराष्ट्र सैनिकांना सतत पक्ष संघटनेचे काम वाढविण्याची प्रेरणा देणारे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे दोन दिवसापूर्वी चंद्रपूर मधे आले होते. शहरातील एनडी हॉटेल मधे झालेल्या आढावा बैठकीत तालुका स्तरांवर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्यात आले. मात्र यामधे बहुतांश पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अगोदरच काहींनी सांगितले होते की माझे नाव समोर घेशील, त्यामुळे ठरल्याप्रमाणे तसेच झाले आणि शक्ती प्रदर्शन सुद्धा होऊन तुम आगे बढो म्हणून घोषणा देण्यात आल्या, तत्पूर्वी स्वताचा उदो उदो करण्यासाठी बाईक रैली पण काढण्यात आली, म्हणजे पूर्णपणे राजकीय स्टंटबाजी करून मुंबई वरून आलेल्या नेत्यांना केवळ हेच पुढे पुढे करणारे पदाधिकारी जिल्हा नेतृत्व करण्यास सक्षम असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. पण हे सर्व खरे आहे का? याचा अभ्यास मात्र मुंबई वरून आलेल्या नेत्यांना झाला की नाही याबद्दल मात्र शंकाच आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चित्र आणि चारित्र्य बघितले तर काही मोजकी टाळकी आहेत ज्यांनी पक्ष संघटना वाढवली पण तेच या आढावा बैठकीत पिछाडीवर होते, म्हणजे त्यांनी शक्तिप्रदर्शन केले नाही एवढेच. मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटन वाढवले की स्वताच्या तुंबड्या भरल्या याचे मूल्यमापन मुंबई वरून आलेल्या पदाधिकारी नेत्यांनी केले नाही एवढे मात्र प्रकर्षाने दिसत आहे. कारण पदाचा वापर करून पैसे कमविण्याचा गोरखधंदा ज्यांनी सुरू केला, ते या आढावा बैठकीत पुढे पुढे होते. जिल्ह्यातील ठेकेदारांना धमकावून पैसे घेणे,अवैध व्यावसायिकांना धमकावून महावारी पैसे घेणे, कुणाचे पैसे काढून देण्याचे काम असो किंव्हा कुणाचे घर खाली करून देण्याचे काम असो किंव्हा कुणाला धमकावण्याचे काम असो मनसेची काही मंडळी सतत यामधे कार्यरत आहे. पण यामधे काही पदाधिकारी आहेत की ते सतत जिल्ह्यातील अनेक समस्यांना प्रशासनापुढे आणून सोडवतत व अन्यायाला वाचा फोडतात पण ते मात्र स्टंटबाजी करत नाही आणि म्हणून त्यांची नावे जिल्हा नेतृत्वा च्या यादीत नाही असे म्हटल्या जात आहे.
मुंबई च्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांसोबत चर्चा करायला हवी होती.कुठल्याही राजकीय पक्षाचे राज्यस्तरीय नेते जेंव्हा कुठल्याही जिल्ह्यात नेतृत्व परिवर्तन करतात तेंव्हा त्यांचा जिल्ह्यातील राजकीय सर्व्हे केल्या जातो त्यामधे पक्षांतर्गत सर्व्हे व जिल्ह्यातील पत्रकार यांच्या मार्फत कुठला नेता व कार्यकर्ता पदांसाठी लायक आहे याविषयी जाणून घेतल्या जाते. पण मनसे नेत्यांनी ना अंतर्गत राजकीय सर्व्हे केला ना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना विचारले गेले, एवढेच नव्हे तर तालुका स्तरीय पदाधिकाऱ्यांना विचारात असताना फक्त त्यांच्या कडून काही प्रश्न विचारून ते लिहून घेण्यात आले पण खऱ्या अर्थाने ते पक्षाच्या नेतृत्व परिवर्तनासाठी फायदेशीर असेल असे नाही कारण ज्यांना जे विचारले जायला हवे होते तेच मुळात विचारल्या गेले नाही अशी चर्चा आहे. त्यामुळे किमान पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर जर पत्रकारांना विचारना केली गेली असती तर त्यातून जिल्ह्यात खरे कोण काम करताहेत हे कळले असते.
मुंबई च्या पदाधिकारी नेत्यांसोबत गडचिरोली पासून चंद्रपूर चे पदाधिकारी कसे?
चंद्रपूर मनसेत फेरबदल करण्याची जबाबदारी घेऊन मुंबई वरून आलेले पदाधिकारी जेंव्हा विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात आले तेंव्हा चंद्रपूर मधून काही पदाधिकाऱ्यांना तिथे बोलावले गेले की ते स्वतःहून फिल्डिंग करून गेले? याबद्दल आश्चर्य व्यक्त होतं आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर मुंबई पदाधिकारी नेत्यांचे स्वागत होणे अपेक्षित आहे पण गडचिरोली पासून चंद्रपूर पर्यंत सोबत असलेला पदाधिकाऱ्यांना काय म्हणून सोबत ठेवण्यात आले किंव्हा कुणाच्या इशाऱ्यावर ते तिथे गेले हे कळायला मार्ग नाही.
संभावित जिल्ह्याचे नेतृत्व स्वीकारणारे खरंच समर्थ असणार का?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काही बुद्धिमान व पक्षाशी एकनिष्ठ असणारे पदाधिकारी आहेतच पण प्रसारमाध्यमांपुढे ज्यांना पक्षाची भूमिका मांडता येत नाही, ज्यांना पक्षाचे ध्येयधोरणे माहीत नाही व ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही किंव्हा त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली गेली नाही त्यांना पक्षाचे नेत्रूत्व दिले तर ते काय होईल? हे न बोललेच बरे, आता येणाऱ्या निवडणुकांत पक्षश्रेष्ठीने संभावित पदाधिकारी यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील नगरपरिषद, जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकांत जर टार्गेट दिले की तुम्ही पक्षाचे उमेदवार निवडून आणा तर त्यातून खऱ्या नेत्रुत्वाची वर्णी पक्षश्रेष्ठी लावू शकतात कारण केवळ सोशल मीडिया मधे दमखम दाखवणारे खरे नेतृत्व करताहेत हा चुकीचा विचार ग्राह्य धरल्यास पक्षश्रेष्ठी चा निर्णय चुकीचा ठरू शकतो कारण पदाधिकारी वारंवर बदलण्यापेक्षा एकाच वेळी चांगला निर्णय होणे कधीही चांगलेच होईल पण मनसे पक्षश्रेष्ठी हे करणार का? हा प्रश्नच आहे.