Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या मंडळींनी सिंधूताईं सपकाळ यांचा आदर्श समोर ठेवण्याची गरजसामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांनी सिंधूताईंना वाहीली श्रध्दांजली

मंदा-किरण संकल्प महिला संस्था भद्रावतीचा उपक्रम

भद्रावती (प्रतिनिधी) :
हजारो अनाथांची माय थोर समाजसेविका सिंधूताई सपकाळ ह्या देहाने हे विश्व सोडून गेल्या. परंतु त्या त्यांच्या कार्य व विचार रुपाने अमर आहे. त्यांचा जिवनपट संपूर्ण मानवजातीसाठी आदर्श ठरला आहे. अंगाला शहारे आणणारी सिंधूताईंची जिवणगाथा, त्यांनी केलेला त्याग, त्यांनी सोसलेल्या वेदना, अनाथ मुला- मुलींना दिलेले प्रेम, त्यांनी अनाथांसाठी घेतलेले कष्ट आणि अनाथ दीन-दुबळ्या मुलांचे घडविलेले जिवन हे सर्व करणाऱ्या अनाथांच्या माईचे मन किती मोठे असेल. त्यांच्या मनाची व्याप्ती आकाश किंवा समुद्रापेक्षाही कमी नव्हती. साधी राहणी, उच्च विचारसरणी असलेल्या या थोर माईचे जिवन सदैव प्रेरणादायी आहे. यामुळेच खऱ्या अर्थाने सामाजिक परीवर्तन होण्यासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या मंडळींनी सिंधूताईं सपकाळ यांचा आदर्श समोर ठेवण्याची गरज असल्याचे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक तथा श्रीनिवासराव शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी सिंधूताईंना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतांना व्यक्त केले.

काल (दि. ८ जानेवारी) शनिवार ला सायंकाळी ६ वा. भद्रावतीच्या श्रीमंगल कार्यालयात “मंदा-किरण संकल्प महिला संस्था भद्रावतीच्या” वतीने आयोजित श्रध्दांजली कार्यक्रमात थोर समाजसेविका अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांना श्रदांजली अर्पण करतांना रविंद्र शिंदे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा निलिमाताई शिंदे, डॉ. आसावरी देवतळे, सुषमाताई शिंदे, पुष्पा ताटेवार, वर्षा धानोरकर व रेखा चहारे यांनी सुध्दा अनाथांची माई सिंधूताई सपकाळ यांना शब्द सुमनाने श्रध्दांजली अर्पण केली. तसेच सर्व उपस्थितांनी दोन मिनीट मौन पाडून संयुक्त श्रध्दाजंली अर्पण केली.

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीच्या संस्थापक अध्यक्षा तथा संचालिका निलिमाताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या श्रध्दांजली कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या डॉ. आसावरी देवतळे, सुषमाताई शिंदे, मंदाताई जूनघरे , पुष्पा ताटेवार, सुनिता खंडाळकर, माजी नगरसेवक राजू गैनवार, पुष्पा ताटेवार, वर्षा धानोरकर, मुक्ता तराळे, आशा तराळे, माया मालवी, रोडे ताई, अनिता दुधे व सुनिता बेलखुडे यांच्यासह मंदा- किरण संकल्प महिला संस्थेच्या अध्यक्षा मंदा तराळे, संस्थेच्या सचिव किरण साळवी यांच्यासह इतर बंधू -भगिंनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे संयुक्त सुत्रसंचलन किरण साळवी व मंदा तराळे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies