चंद्रपूर :- पंडित जवाहरलाल नेहरू सेमी इंग्लिश प्रायमरी स्कूल महानगरपालिका संजयनगर चंद्रपूर येथे दिनांक 7/1/2022 रोज शुक्रवारला घेण्यात आला. या कार्यक्रमा ला अमोली विमेंस फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ. वनश्री मेश्राम व या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा .सरिता मालू सामाजिक कार्यकर्ती, तसेच प्रमुख पाहुणे मा.अश्विनी खोब्रागडे, स्व. बापूराव वानखेडे विद्यालय संजय नगर मुख्याध्यापक मा. आर बी .साखरकर सर, पंडित नेहरू शाळेतील मुखध्यापक मा. गोरे सर, अमोली ग्रुप च्या सचिव उर्वशी रवीचंद्रन, उपाध्यक्षा पूनम नागदेवते , कोषाध्यक्षा नम्रता वावरे, मा .जाधव ताई, मा. येडे मॅडम, मा. चिलखे मॅडम, मा. देहेकर मॅडम, रंजनी खोब्रागडे. पिदूरकर सर, आत्राम सर, गिरीवार सर, व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
सावित्रीबाई जयंती ही बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. फ्रेंड्स चॅरिटी ग्रुप कडून गरीब विद्यार्थीना शाळेचे गणवेश व अमोली विमेंस फाउंडेशन चंद्रपुर कडून नोटबुकचे वाटप करण्यात आले. सर्व पाहुण्या मंडळींनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले व सावित्रीबाई जयंती निमित्याने चिवडा व सोनपापडी वाटण्यात आली. सर्व उपस्थितांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.