• चार आरोपी ताब्यात ; 8 लाख 90 हजाराचा मुद्देमाल जप्त
राजुरा पोलिसांना राजुरा ते गडचांदुर रोडवर मौजा आर्वी गावाजवळील जिनींगच्या बाजुला एका शेतात ट्रक मध्ये चोरीचा कोळसा भरत आहे अशी माहिती मिळाली. दुपारी दोन वाजताच्या दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीप्रमाणे एक ट्रक दिसला.
या ट्रक जवळ जाऊन पोलिसांनी पाहणी केली असता त्यात दगडी कोळसा भरुन असलेला दिसला पोलिसांनी ट्रकच्या कॅबिन मध्ये बसलेल्या इसमांना सदर कोळशाचे पास, परवाना, बिल बद्दल विचारले असता कँबिन मध्ये बसलेल्या इसमांनी कोणतेही कागदपत्र न दाखवता उडवाउडवीचे उत्तर दिले यावरुन सदर माल हा चोरीचा दाट संशय आल्याने पोलिसांनी पंचासमक्ष पाहणी असता 33 टन 50 किग्रॅ. दगडी कोळसा अंदाजे किमंत 90 हजार व ट्रक क्र. AP-07 TF-7489 किमंत अंदाजे 8 लाख असा 8 लाख 90 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी ट्रक चालक मोहमद अब्दुल मुजीम अब्दुल गफार वय 40 रा. अंकुशपुर, जि. भुपालापेल्ली तेलंगना, बलदेव सिंग रजवेन्द सिंग शेरगील उर्फ लल्ली वय 27, शेख वाजीद शेख बाशिद वय 40, जैयनुद्दीन सिराज सैय्यद वय 22 • तिन्ही रा. सोमनाथपुरा राजुरा यांना ताब्यात घेतले. सदर कारवाई सपोनि पी. आर. साखरे यांनी केली. पोलिसांनी भादवि कलम 379, 34 अन्वये गुन्हा दाखल केला असून समोरील कारवाई उपविभायीय पोलीस अधिकारी राजा पवार, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या मार्गदर्शनात सपोनि झुरमुझे करीत आहे.