श्रीराम सी स्विमिंग क्लब पोरबंदर गुजरात यांच्या वतीने गुजरात येथे समुद्र पोहण्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत चार स्पर्धक विजेते ठरले आहे. स्विमिंग प्रशिक्षक नामदेव राऊत यांच्या वतीने या स्पर्धकांच्या स्वागत व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे पंकज गुप्ता यांच्या हस्र्ते सदर विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. यावेळी श्री. साई एजन्सीचे राजू पटकोटवार, दिवसे कृषी केंद्राचे मोरेश्वर दिवसे, निलेश इलेक्ट्रीकचे विलास नगराळे, जय महाकाली आटो क्लर्सचे रवि आंबटकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
गुजरात येथील पोरबंदर येथे 9 जाणेवरीला राज्यस्तरीय समुद्र जलतरंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरासह चंद्रपूरातील स्पर्धेकांनीही भाग घेतला होता. यात चंद्रपूरचे कपिल गोन्नाडे, सरोश उपरे, पारुल पिदूरकर आणि स्वचेत कंदिकुरवार या स्पर्धकांनी यश मिळवत चंद्रपूर जिल्हाचे नाव लौकीक केले आहे. दरम्याण या विजेत्या स्पर्धकांचा स्वागत व सत्कार सोहळ्याचे आयोजन मामा तलाव येथे करण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे पंकज पुप्ता यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सदर स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लालाजी, राजेश, मुन्नाभाऊ, चेतन, प्रविण, आदिंची उपस्थिती होती.