कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवे नियम लागू केले आहेत. यामध्ये अनेक निर्बंध नव्याने लागू करण्यात आले आहेत. ही नवी नियमावली उद्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे.
काय राहणार बंद
- मैदाने, उद्याने, पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद
- स्विमिंग पूल, जिम, स्पा पूर्णपणे बंद
पर्यटन स्थळं बंद, पार्क, प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क पुढील आदेशापर्यंत बंद
अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध
15 फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद
काय राहणार सुरू
- रेस्टॉरंट्स, नाट्यगृहे चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेने रात्री 10 पर्यंत सुरू राहणार
• लग्नाला 50 तर अंत्यविधीला 20 जणांनाच परवानगी
- रेस्टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेने रात्री 10 पर्यंत सुरू राहणार
- सलून 50% क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी - नव्या नियमावलीनुसार राज्यात सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत
जमावबंदी
- रात्री 11 ते सकाळी 5 संचारबंदी लागू राहणार आहे.
- लोकल वाहतुकीवर कुठलेही निर्बंध लागू करण्यात आलेलेनाही.
- शॉपिंग मॉल्स, मार्केट मध्ये 50% क्षमतेने उपस्थिती सुरू ठेवण्यात येणार आहे.
- शॉपिंग मॉल किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी दोन डोस
घेतलेले बंधनकारक
- प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये वर्क फ्रॉम होम, 50 टक्के पेक्षा अधिक जणांना परवानगी नाही