चंद्रपूर :- हिंदुह्दय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त युवासेना- युवतीसेना तर्फे ला युवासेना सचीव मा.वरूनजी सरदेसाई साहेब, युवासेना कार्यकारीणी सदस्य रूपेश दादा कदम,शितलताई देवरूखकर, युवासेना विस्तारक नित्यानंदजी त्रिपाठी, युवतीसेना विस्तारक त्रुष्नाताई गुजर, चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख मा.संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा सेना जिल्हाप्रमुख मा.प्रा.निलेश बेलखेडे यांच्या वतीने व नेतृत्वाखाली चंद्रपुर येथे विविध ठिकाणी अनाथ आश्रम, वृद्धाश्रम व गरजूंना ब्लॅंकेट्स चे वितरण करण्यात आले तसेच यावेळी युवतीसेना च्या वतीने गरिब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण करण्यात आले. यावेळी महिला आघाडी तालुका संघटिका उज्वला प्र.नलगे,युवासेना जिल्हा चिटणीस विनय धोबे, युवतीसेना उपजिल्हा प्रमुख रोहीनी पाटील,यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुलांच्या अनाथ आश्रम येथे युवासेना-युवती सेना च्या वतीने हिन्दुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आलं व त्याचा प्रतिमेस माल्ल्यार्पण करण्यांत आले.यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख निलेश भाऊ बेलखेडे यांनी स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा विचार व कार्याबद्दल माहिती देत समाजकार्यासाठी सदैव कार्यरत राहावे असे सांगितले व युवासेना युवतीसेना सदैव जन सेवेसाठी तत्पर राहून गरजूंच्या मदतीसाठी तयार राहील असे वचन दिले.यावेळी उपस्थिती मध्ये युवासेना उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर लोनगाडगे,युवासेनाशहर समन्वयक करन वैरागडे, युवासेना शहर चिटनीस नगाजी गनफाडे,उपशहर प्रमुख वैभव काळे सुरज घोंगे, सद्दाम कनोजे शिवसैनिक, युवती सेनेच्या काजल बुटले, आरती समुद्रपुरवार,धनश्री हेडाऊ ,संतुष्टी बुटले,युवासेनेचे सुश्मित गौरकार, रोहित नलगे, मुकेश जक्कुलवार, किरन निब्रड , रोहन नलगे, गोपाल सोनकुसरे, योगेश पुनवटकर, चेतन कांबळी,अविनाश पानघाटे, धीरज बोभाटे, पवन चौधरी, केतन शेरकी समस्त शिवसैनिक, युवासैनिक, युवतीसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदुह्दय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त युवासेना- युवतीसेना तर्फे ब्लॅंकेट्स, शैक्षणिक साहित्य,व मिठाईचे वितरण
जानेवारी २४, २०२२
0
Tags