जगन्नाथबाबा नगरात उत्स्फुर्त प्रतिसाद
उपमहापौर राहुल पावडे यांचा निवास्थानी मन की बात संपन्न
चंद्रपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मनातील विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आज दिनांक 30 जानेवारी रोजी मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी झाले.या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना तसेच विशेष करून युवक-युवती ला प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील प्रेरणा जागृती करण्याचा मुख्य उद्देश आहे त्याच प्रमाणे,नागरिकांनी केलेल्या अदभुत नावीन्य प्रेरणादायी संदेश जन सामान्य पर्यंत पोहचवून इतरांनी आदर्श घ्यावा हा मुख्य उद्देश मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा आहे चंद्रपूर मनपाचे उपमहापौर राहुल पावडे यांच्या पुढाकाराने स्थानिक जगन्नाथबाबा नगर स्थित कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातचे थेट प्रक्षेपण वार्डातील लोकांना टीव्हीच्या माध्यमातून दाखवण्यात आले. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभला.
मन की बात कार्यक्रम संदर्भात माजी वित्त नियोजन व वनमंत्री तसेच विधीमंडळाच्या लोकलेखा समीतीचे अध्यक्ष आ सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारला ऑडीओ ब्रिजच्या माध्यमातून चंद्रपूर महानगरातील सर्व भाजपा पदाधिकारी, सर्व शक्तीकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख तसेच बुथप्रभारींसोबत संवाद साधून सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी मोठ्या संख्येने वार्डातील नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. मन की बात एक उपक्रम प्रोग्रमच नसून या माध्यमातून देशाच्या विकासात व देशाच्या विविध कार्यात या माध्यमातून सर्वांना प्रेरणा घेवून सर्वांना विविध घटकातील नागरिकाने पुढे यावे याकरिता हा कार्यक्रम संपूर्ण देशात उपयुक्त ठरत आहे आज संपूर्ण देशामध्ये रेडिओ टीव्हीच्या माध्यमातून दाखविण्यात येत आहे. यावेळी वार्डातील ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष युवावर्ग त्यांच्या कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित होते.