भद्रावती :- किल्ला वार्ड सोसायटीचे वीर सैनिक यांच्या आग्रहास्तव युवा संघ स्पोर्टिंग क्लब किल्ला वार्ड कुणबी सोसायटी भद्रावती यांच्या वतीने भव्य पुरुष लोकल व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा दिनांक 25 जानेवारी 2022 लाल किल्ला वार्ड कुणबी सोसायटीच्या भव्य पटांगणावर पार पडला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक श्री नंदू पडाल तर उद्घाटक श्री प्रफुल चटकी हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे श्री धनराज जी आस्वले, श्री पांडुरंग जी टोंगे,श्री राजेश भाऊ मत्ते,श्री भारत जी ठक, श्री विलास जी देठे,श्री रासेकर काकाजी,श्री दिवसे काकाजी,श्री भास्कर भाऊ बोंडे श्री युवराज भाऊ धानोरकर श्री प्रवीण भाऊ सातपुते तसेच किल्ला वार्ड येथील देशसेवेसाठी लढणारे सैनिक उपस्थित होते याप्रसंगी श्री नंदू भाऊ पढाल यांनी मार्गदर्शन करताना खेळाडूंना आरोग्य ठीक राहण्यासाठी मैदानी खेळ खूप महत्त्वाचा आहे व कोणताही खेळ खेळताना खेळाडू वृत्ती ने खेळावे असे मार्गदर्शन केले याप्रसंगी इतर सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री घनश्याम आस्वले यांनी केले तरआभार प्रदर्शन रुपेश घागी यांनी केले. या कार्यक्रमा च्या यशस्वितेकरिता कृष्णा बांदुरकर, प्रदीप मोहितकर, शुभम हरबडे, रामकृष्ण टोंगे पंकज खातखेडे,विवेक वाढई, चेतन बोनसुले,खुशाल लोहे,आरू घोरपडे,तनुष बांदूरकर,ओम लांडे,सृजल बेहरे,कृष्णा खंडाळकर,यांनी परिश्रम केले.
युवा संघ स्पोर्टिंग क्लब तर्फे आयोजित व्हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटन
जानेवारी २५, २०२२
0
Tags