महाराष्ट्रच्या हितासाठी... सर्वांचाच सेवेसाठी! या ब्रीदवाक्य अंगाशी बाळगून संपूर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा मानबिंदू ठरलेल्या संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य नागपुर विभागाचा वतीने वंदनीय सावित्रीबाई फुले यांच्या 191 व्या जयंती निमित्य विदर्भ स्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेच्या आयोजन श्री. ज्ञानेश्र्वर वसंतराव सानप चेअरमन, संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व श्री. गोरक्ष चांगदेव भवर सचिव, संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे करण्यात आलं होत.*या स्पर्धेत संपूर्ण विदर्भातून एकुण 650 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.* हि स्पर्धा दुपारी 2 ते 4 या दरम्यान संपूर्ण शासनाचा नियमांचा पालन करून घेण्यात आल होत. स्पर्धेत एकूण 100 प्रश्नाच्या समावेश होता. व प्रत्येकी प्रश्नाला एक गुण होतें. व सर्व स्पर्धकांनी सर्व नियमांच्या पालन करुन शांततेत स्पर्धा देऊन येऊन यशस्वी रित्या स्पर्धा पार पाडली. या स्पर्धा घेण्याचा मागचं उद्देश म्हणजे विद्यार्थ्याना भविष्यात स्पर्धेच्या सामना करावच लागणार आहे. तर त्याची सुरुवात आत्ता पासूनच विद्यार्थ्याना केली पाहिजे व स्पर्धा काय आहे ते त्या विद्यार्थ्याला कडल पाहिजे म्हणून हि स्पर्धा घेण्यात आली. व विद्यार्थांच्या सार्वजानिक विकास झालं पाहिजे म्हणून या स्पर्धेच्या आयोजन करण्यात आला. असे संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे विस्तार समिती अध्यक्ष तथा नागपूर विभाग प्रमुख श्री. राजेश बसवेश्वर हजारे यांनी सांगितले. व या स्पर्धेच्या उकृष्ट अयोजन संजीवनी फाऊंडेशन नागपुर विभागाचे विश्वस्त श्री.शुभम निंबाळकर व संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे विस्तार समिती सदस्य श्री. इजाज शेख यांनी केले. या स्पर्धेच्या संयोजन समितीत श्री. धीरज पाल, उपाध्यक्ष संजीवनी फाऊंडेशन चंद्रपूर, श्री. कुंदन खोब्रागडे, सचिव संजीवनी फाऊंडेशन चंद्रपूर, श्री.अविनाश चोले अध्यक्ष संजीवनी फाऊंडेशन चंद्रपूर महानगर, श्री. इमरान शेख, तालुका अध्यक्ष,संजीवनी फाऊंडेशन कोरपना यांनी उत्कृष्टरीत्या नियोजन करून स्पर्धा घेतली. रुचिता टोकलवार, आकाश वानखेडे, श्रध्दा कोहळे, विश्वजित नायक, स्नेहा आसुटकर, सिध्दांत निमसरकार, कोमल मंडल, लव्हली तुलसानी, श्वेता नदुरकर, सोनल कामडी,करण झाडे, रितेश झालटे इत्यादींनीचा अथक परिश्रमाने ही स्पर्धा थाटात संपन्न झाली.
संजीवनी फाऊंडेशन कडून घेण्यात आलेल्या विदर्भ स्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद
जानेवारी ०६, २०२२
0
Tags