चंद्रपूर :- अपघातात बळी गेलेले बहुतांश दुचाकीस्वार हेल्मेट न वापरल्याचे निदर्शनास आल्याने वाहतूक नियंत्रण शाखेने हेल्मेट न वापरणाऱ्यांविरोधात मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, १७ जानेवारीपासून हेल्मेट सक्तीची मोहीम राबविण्यात येणार आहे. सुरुवातील पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, त्यानंतर इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. यानंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी हेल्मेटसक्तीची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी सांगितले.
आजपासून जिल्ह्यात हेल्मेट सक्ती
जानेवारी १६, २०२२
0
Tags