Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

घुग्घुसच्या काँग्रेस नेत्यांनी केली सफेद झेंडा कामगार संघटनेच्या आंदोलन स्थळी तोडफोड
मद्यधुंद अवस्थेत ठाण्यासमोर घातला धुळघूस, दिवसभर तणावाची स्थिती.

फिर्यादी विवेक परशुराम पचारे (32) रा. केमिकल वार्ड, घुग्घुस हा एसीसी सिमेंट कंपनी नकोडा येथे जिआर इंजिनिअरिंग कंपनीत सुपरवायजरचे काम करतो. त्याचा देखरेखित 10 कामगार काम करतात. सध्या एसीसी कंपनीच्या विरोधात कामगारांचे पीएफ भरला नाही इतर 19 मागण्याकरिता दिनांक 27 जानेवारी पासून सफेद झेंडा कामगार संघटने कडून कामबंद आंदोलन सुरु आहे.


विवेक पचारे, ठेकेदार हरीद्राथ दत्ता सोबत काम करणारे सय्यद इस्ताक मुख्तार, अनुप सिंग, श्रीनिवास बहादूर, गोपाल शर्मा, गणेश बदखल, देवराज यादव हे घुग्घुस येथील बीएसएनएल टॉवर जवळ दुपारी 12:40 वाजता असतांना त्याठिकाणी पाच ते सात लोक गाडी घेऊन आले. त्यापैकी कृष्णा पाईकराव, ललित गाताडे, दत्ता वाघमारे हे तिघेही विवेक पचारे यांच्या जवळ जाऊन त्यांना अश्लील शिवीगाळ करून हाथाबुक्काने मारहाण केली त्यामुळे तो खाली पडला सय्यद मुख्तार हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्याला सुद्धा अश्लील शिवीगाळ करून हाथाबुक्क्याने मारहाण केली.
फिर्यादी- विवेक परशुराम पचारे (32) रा. केमिकल वार्ड घुग्घुस यांच्या तक्रारी वरून आरोपी- कृष्णा पाईकराव, ललित गाताडे, सुरेश पाईकराव, दत्ता वाघमारे सर्व रा. घुग्घुस यांच्यावर कलम 294,323,506 (34) गुन्हा दाखल पोलिसांनी केला. विवेक पचारे हा काँग्रेसचे किसन सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांच्या भाऊ असल्याने काँग्रेसचे किसन सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजू रेड्डी, एससी सेलचे जिल्हाध्यक्ष पवन आगदारी यांनी आपल्या अनेक समर्थकासह घुग्घुस पोलीस स्टेशन येथे गर्दी केली व सफेद झेंडा कामगार संघटनेच्या समर्थकांनी गर्दी केली होती त्यामुळे पोलीस ठाण्यात बाचाबाची सुरु झाल्याने पोलिसांनी सर्वांना बाहेर काढले परंतु गेट समोर मद्यधुंद अवस्थेत काही लोकांनी एकामेकांना धक्काबुक्की केल्याने तणाव निर्माण झाला त्यामुळे पोलिसांनी काही लोकांना सौम्य लाठीचा प्रसाद दिला.


त्यानंतर दुपारी 4:30 वाजता दरम्यान नकोडा येथील बाजार ओट्या जवळ सफेद झेंडा कामगार संघटनेच्या आंदोलन स्थळी काँग्रेस किसन सेलचे जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, काँग्रेस शहर अध्यक्ष राजू रेड्डी, अनुप सिंग, बंटी अड्डूर, श्रीनिवास बहादूर, सुधाकर जुनारकर मिळून गेले.

फिर्यादी- शफी हैदर आलाम (29) रा. लूंबिनी नगर, घुग्घुस हा कामगार राकेश काटकर, दत्ता वाघमारे, शाम कंडे, इसराईल शेख, प्रवीण जोगी, नितीन किन्नाके, अशोक निषाद, अशोक आसमपेल्ली हे पेंडाल मध्ये बसून असतांना सुधाकर जुनारकर हा पेंडाल मध्ये घुसला व अश्लील शिवीगाळ करून पेंडाल मधील खुर्ची उचलून आंदोलनकर्ते शफी आलाम यांच्या अंगावर मारली त्यामुळे त्याला दुखापत झाली. त्यामुळं तो पेंडाल खाली उतरला तेव्हा काँग्रेस किसन सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुप सिंग, श्रीनिवास बहादूर या तिघांनी मिळून हाथाबुक्क्याने मारहाण केली त्यामुळे तो बाजूला गेला पेंडाल मध्ये घुसून राकेश कातकर, दत्ता वाघमारे यांना मारहाण केली व पेंडाल मधील खुर्च्या उचलून फेकल्या व तोडफोड केली व पोलिसांना पाहून निघून गेले. त्यांच्या तक्रारी वरून आरोपी- काँग्रेस किसन सेलचे जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, सुधाकर जुनारकर, अनुप सिंग, श्रीनिवास बहादूर यांच्यावर कलम 324,323,294 (34) गुन्हा दाखल करण्यात आला.
आंदोलन स्थळी काँग्रेस नेत्यांनी धुळघूस घालून तोडफोड केल्याने एकच खळबळ उडाली. परिस्थिती चिघडल्याने सहा. पो. नि. संजय सिंग व मेघा गोखरे यांनी दंगा नियंत्रण पथकास बोलाविले सायंकाळी उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांनी घुग्घुस पोलीस स्टेशन येथे भेट दिली रात्री पर्यंत तणावाची स्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies