Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

अवैध मुरूमाचा गडचांदूर न.प. कामात ही वापर ?मयूर कन्स्ट्रक्शन कंपनी चा प्रताप !

गडचांदूर (प्रति.)
गडचांदूर येथील मयूर कन्स्ट्रक्शन कंपनी ही गडचांदूर नगर परिषदेचे कंत्राट घेत असते. नुकतेच जीवतीतील तालुक्याच्या हद्दीत मयूर कन्स्ट्रक्शन कंपनीकडून जिवती तालुक्याचा हद्दीत पेसा क्षेत्रातील धनकदेवी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मरका गोंदी शिवारातील शासकीय महसूल जमिनीवरील पकडी गुड्डम जलाशयाच्या संचयन भागाला लागून असलेल्या जमिनीतून बिना परवानगीने जेसीपी यंत्र व हायवा ट्रकद्वारे अविरत शासनाचा महसूल बुडवित चोरीने मुरूम उत्खनन करून कोरपना तालुक्यातील उंबर हिरा जांभूळधरा तसेच वनसडी कारगांव बु. या रस्ते कामावर या भागातील मुरूमाचा वापर सर्रास सुरू असून जीवती येथील महसूल अधिकारी यांच्या आशिर्वादाने गडचांदूरातील मयूर कन्स्ट्रक्शन कंपनी गेल्या अनेक दिवसांपासून या भागातून मुरूम उत्खनन करीत असल्याचे लक्षात येताच जिवती चे मंडळ अधिकारी पचारे, येरगव्हाण साजा तलाठी कुळमेथे आपल्या ताफ्यासह मोक्यावर पाहणी करण्यास गेले असता त्याठिकाणी उत्खनन केलेला खड्डा तसेच जेसीबी मोक्यावर आढळली व हायवा ट्रकद्वारे मुरूम भरलेले वाहन पसार होण्यात यशस्वी झाले. वाहनाचे फोटो व घटनास्थळी पाहणी केली. मात्र उत्खनन होत असलेला भाग जीवती तहसिल क्षेत्रात येत असल्याने पुढील कार्यवाही त्यांचेकडून करण्यात येणार असल्याचे कळते. या भागात मुरूम लाल खडक चोरीला जात असतांना पाटबंधारे विभाग व महसूल अधिकारी यांना याची माहिती का नाही? संबंधित अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमताने ही चोरी होत असल्याचे आता स्पष्ट होत आहे.

महत्वाचे म्हणजे स्थानिक गडचांदूर येथील मयूर कन्स्ट्रक्शन कंपनी ही गडचांदूर नगर परिषदेचे कंत्राट घेत असते.
त्यामुळे गडचांदुर नगर परिषदेच्या कामात ही अवैध मुरूमचा वापर होत असुन गडचांदूर नगर परिषदेने याकडे लक्ष देवून मयूर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या गडचांदूरातील नगर परिषदेच्या कामात वापरल्या गेलेल्या खनिज संपत्तीची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies