औरंगाबाद येथील "हॉटेल वर्षाइन"च्या सभागृहात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांची उपस्थिती.
औरंगाबाद :-
दैनिक मराठवाडा साथी चे संस्थापक संपादक तथा मराठवाडा परीसरात ज्यांनी तब्बल 40 वर्ष पत्रकारिता करून मोठमोठे पत्रकार घडवले त्या स्वर्गीय मोहनलाल जी बियाणी यांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार साप्ताहिक तथा वेब न्यूज पोर्टल चे संपादक राजू कुकडे यांना या पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मंडे यांच्या हस्ते देण्यात आला या प्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवतराव कराड यांची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवतराव कराड यांनी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मंडे यांनी पत्रकारांच्या समस्या संदर्भात उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांना समर्पक उत्तर देऊन येणाऱ्या काळात पत्रकारांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी स्वयंरोजगार उभारावा त्यासाठी केंद्र सरकार मदत करेल असेही ते म्हणाले